Nashik Rain: कामासाठी घरातून बाहेर पडला, वाटेत अनर्थ घडला; अंगावर झाड कोसळून तरुणाचा जागीच मृत्यू
Saam TV May 13, 2025 01:45 AM
अभिजित सोनावणे, नाशिक

नाशिकमध्ये अंगावर झाड कोसळून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. नाशिकला अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने झोडपून काढले आहे. अशामध्ये अंगावर झाड कोसळून एका तरुणाचा मृत्यू झाला तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला. नाशिकमधील सातपूरजवळ ही घटना घडली. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सातपूर भागाला अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा जोरदार फटका बसला. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाड कोसळल्याच्या घटना घडल्या. कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या तरुणाचा अंगावर झाड कोसळल्यामुळे मृत्यू झाला. गौरव रिपोटे (२१ वर्षे) असं मृत तरुणाचे नाव आहे.

गौरव नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी दुचाकीवरून निघाला होता. पण वाटेत त्याच्या अंगावर झाड कोसळले आणि त्याचा मृत्यू झाला. तर संम्यक भोसले (२१ वर्षे) हा तरूण गंभीर जखमी झाला. नाशिकच्या जिल्हा त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तर गौरवचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. गौरवच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, गौरव दोन बहिणीचा एकुलता एक भाऊ होता. तर गौरवचे वडील नाशिक रोड येथील माल धक्क्यावर मोल मजुरी करतात. आज दुपारी गौरव सेकंट शिफ्टला जात होता. त्याच्यासोबत त्याचा मित्र देखील होता. अशातच सातपूरजवळ त्यांच्या अंगावर झाड कोसळले आणि गौरवचा मृत्यू झाला. तर संम्यक गंभीर जखमी झाला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.