Satara Apshinge Military : "साताऱ्याच्या 'या' गावात घडले शेकडो जवान! जाणून घ्या 'या' खास गावाची ब्रिटिशांशी नाळ!"
Sarkarnama May 13, 2025 01:45 AM
Apshinge Military Satara गावाचं हटके नाव

महाराष्ट्रातलं एक गाव – अपशिंगे! हे गाव इतकं वेगळं आहे की पहिल्या महायुद्धात या गावाने एवढं मोठं योगदान दिलं की ब्रिटिशांनीच त्याला नाव दिलं – "अपशिंगे मिलिटरी"!

Apshinge Military Satara "ग्रामपंचायत अपशिंगे मिलीटरी"

कराडच्या दिशेने हायवेवर साधारण 14 किलोमीटर गेलं की उजवीकडे बोरगाव रोड दिसतो. तिथून चार किलोमीटर आत गेल्यावर "ग्रामपंचायत अपशिंगे मिलीटरी" अशी मोठी कमान तुमचं स्वागत करत उभी असते.

Apshinge Military Satara प्रत्येक घरात एक सैनिक

या गावातं सुमारे 350 कुटुंबं आहेत, आणि गंमत म्हणजे जवळपास प्रत्येक घरात एकतरी माणूस सैन्यात आहे – आजही!

Apshinge Military Satara शहिदांची यादी लांबच लांब

पहिल्या महायुद्धात 46 जवान शहीद झाले. पुढे 1962, 1965, 1971 – या सगळ्या युद्धांतही गावानं आपल्या सैनिकांचं योगदान दिलं.

Apshinge Military Satara सैन्य म्हणजेच जीवनशैली

इथली मुलं लहानपणापासून परेड, ड्रिल शिकतात. गावात स्वतःचं जिम आणि लर्निंग सेंटरही आहे – अगदी भरतीसाठी तयार!Apshinge Military Satara

Apshinge Military Satara शिवकालीन वारसा

या गावातले निकम कुटुंबीय थेट निकुंभ राजपूतांशी जोडले गेलेत. म्हणजेच शिवाजी महाराजांच्या काळापासूनच इथं शौर्याचं बाळकडू आहे!

Apshinge Military Satara सन्मान आणि गौरव

गावात शहीद सैनिकांचं स्मारक आहे. आणि हो – 2022 मध्ये गावाला ‘शन्मुख शौर्य रत्न’ पुरस्कारही मिळाला होता.

Next : भारताच्या सुरक्षा यंत्रणेतील 'बापमाणूस' अजित डोवाल किती शिकलेत?
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.