Maharashtra Board SSC Result 2025: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षाचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, लातूर, नागपूर आणि रत्नागिरी या विभागातून 15 लाख 39 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. दहावीचा निकाल 94.10 टक्के इतका लागला आहे. या वर्षी कोकण विभागाने बाजी मारली आहे. सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा आहे. यंदा मुलींच्या उत्तीर्णचे टक्केवारी ९६.१४ टक्के आहे. मुलांची टक्केवारी ९२.३१ आहे. म्हणजे मुलींचा निकाल ३.८३ टक्के जास्त आहे.
माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे दहावीसाठी ६२ विषयांसाठी घेतली होती. त्यापैकी २४ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी निकालाची माहिती माध्यमांना दिली.
दहावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळवणारे विद्यार्थी २११ आहेत. त्यात शंभर टक्के गुण मिळवणारे सर्वाधिक विद्यार्थी लातूर बोर्डाचे आहेत. लातूरच्या ११३ विद्यार्थ्यांना शंभर टक्के मिळाले आहे. पुण्यातील १३ जणांना शंभर टक्के गुण मिळाले आहे. नागपूरमध्ये ३, संभाजीनगर ४०, मुंबई ८, कोल्हापूर १२, अमरावती ११, नाशिक २, कोकण ९ जणांना शंभर टक्के गुण मिळाले आहेत.