रक्तातील युरिक अॅसिड वाढल्यास सांधेदुखी, गाठ, किडनीच्या समस्या होऊ शकतात.
युरिक अॅसिड कमी करण्यासाठी काही नैसर्गिक उपाय उपयुक्त ठरू शकतात, मात्र डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
या बियांना काळे जिरे असेही म्हणतात. त्यामध्ये भरपूर अँटिऑक्सिडंट्स, फायबर, प्रथिने, पोटॅशियम आणि अमिनो ॲसिड असतात.
दररोज सकाळी रिकाम्या पोटी कलौंजीचे पाणी प्यायल्याने युरिक अॅसिड कमी होण्यास मदत होते.
निगेला बियांमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे सांध्यातील वेदना आणि सूज कमी करतात.
हे पाणी शरीरातील डिटॉक्सिफिकेशन करतं आणि रक्त शुद्ध करण्यात मदत करतं.
कलौंजी पाण्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते, ज्याचा अप्रत्यक्ष फायदा युरिक अॅसिड नियंत्रणात होण्यावर होतो.
रात्री १ चमचा कलौंजी १ ग्लास पाण्यात भिजवा. सकाळी गाळून पाणी प्या. बिया खाणेही फायद्याचे.
नियमित सेवन केल्यास युरिक अॅसिडची पातळी हळूहळू कमी होऊ शकते.
अति सेवन टाळा – रोज १ ग्लास पुरेसा आहे.