पोस्ट ऑफिसच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी! घरी बसून अवघ्या काही मिनिटांत मिळणार ‘ही’ सेवा
Marathi May 14, 2025 12:25 AM

व्याज प्रमाणपत्र: पोस्ट ऑफिसमध्ये (Post Office) गुंतवणूक (Investment)  करणाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. आता घरी बसून काही मिनिटांमध्येच तुम्हाला कागदपत्रे मिळणार आहेत. तुम्हाला शाखेत जाण्याची गरज लागणार नाही. पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते, आरडी खाते किंवा एफडी खाते असलेले कोणीही आता त्यांच्या घरबसल्या व्याज प्रमाणपत्र डाउनलोड करु शकतात.

टपाल विभागाने पोस्ट ऑफिसच्या इंटरनेट बँकिंग पोर्टलद्वारे व्याज प्रमाणपत्र डाउनलोड करण्याची सुविधा सुरु केली आहे. यामुळे पोस्ट ऑफिस सेव्हिंग्ज बँक (POSB) खातेधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. म्हणजेच, जर तुमचे पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते असेल किंवा तुम्ही एफडी केली असेल, तर आता तुम्हाला व्याज प्रमाणपत्रासाठी पोस्ट ऑफिसच्या कोणत्याही शाखेत जाण्याची आवश्यकता नाही. या निर्णयाचा सर्वाधिक फायदा ज्येष्ठ नागरिकांना होईल. आयटीआर भरताना तुम्हाला या प्रमाणपत्राची आवश्यकता असू शकते.

व्याज प्रमाणपत्र का आवश्यक?

7 मे 2025 रोजी, पोस्ट विभागाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, इंटरनेट बँकिंग ग्राहकांच्या सोयीसाठी, ई-बँकिंग वापरकर्त्यांना इंटरनेट बँकिंग पोर्टलद्वारे व्याज प्रमाणपत्र डाउनलोड करण्याची तरतूद करण्यात आली आहे. कर भरण्यासोबतच, क्रॉस चेकिंगसाठी व्याज प्रमाणपत्र देखील आवश्यक आहे. जमा केलेल्या रकमेवर तुम्हाला दिलेल्या रकमेनुसार व्याज मिळत आहे का हे पाहण्यासाठी. ज्यांचे उत्पन्न करपात्र मर्यादेपेक्षा कमी आहे त्यांच्यासाठी देखील व्याज प्रमाणपत्र आवश्यक आहे. व्याज प्रमाणपत्राच्या आधारे, त्यांना टीडीएस कपात टाळण्यासाठी फॉर्म 15 जी/फॉर्म 15 एच भरावा लागेल.

घरी बसून व्याज प्रमाणपत्र डाउनलोड करण्याची संपूर्ण प्रक्रिया काय?

सर्वप्रथम ebanking.indiapost.gov.in या वेबसाइटवर जा.
जर तुम्ही आधीच नोंदणीकृत असाल तर तुमचा वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा आणि जर तुम्ही नोंदणीकृत नसाल तर तुम्हाला प्रथम साइन अप करावे लागेल.
लॉग इन केल्यानंतर, अकाउंट्स टॅबवर जा.
आता इंटरेस्ट सर्टिफिकेट वर क्लिक करा.
यानंतर, तुम्हाला ज्या आर्थिक वर्षासाठी व्याज प्रमाणपत्र डाउनलोड करायचे आहे ते वर्ष निवडावे लागेल.
आता तुम्ही व्याज प्रमाणपत्र डाउनलोड करू शकता.

पोस्ट ऑफिसच्या विविध योजना देखील आहेत. या योजनांमध्ये गुंतवणुकीचा ग्राहकांना चांगला फायदा मिळतो. कारण ग्राहकांच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा पोस्टऑफिसच्या विविध योजनांमध्ये मिळतो. त्यामुळं अनेकजण पोस्ट ऑफिसमध्ये पैशांची गुंतवणूक करण्याला प्राधान्य देतात.

महत्वाच्या बातम्या:

पैसे येतात, पण जातात कुठे? नेमकं कसं कराल आर्थिक नियोजन? ‘या’ 5 गोष्टींचा अवलंब करा टेन्शन फ्री राहा

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.