India–Pakistan War And Maharashtra Live Update : सीए फायनल आणि इंटरमिजिएट परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर
Sarkarnama May 13, 2025 08:45 PM
CA Exam : सीए फायनल आणि इंटरमिजिएट परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने (आयसीएआय) भारत-पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीमुळे पुढे ढकललेल्या सीए परीक्षांचे नवे वेळापत्रक जाहीर केले आहे. आता या परीक्षा 16 ते 24 मेदरम्यान घेतल्या जाणार आहेत. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती तयार झाल्याने सीए फायनल आणि इंटरमिजिएट या दोन्ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या.

Pratap Sarnaik : राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये लवकरच भरती; प्रताप सरनाईक यांची माहिती

राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये लवकरच भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून याबाबतच्या ठरावाला महामंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा प्रस्ताव आता सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येत आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

Cyber attacks : 'ऑपरेशन सिंदूर' नंतर सीमेपलीकडून सायबर हल्ले तीव्र

सीमेपलीकडून होणारे सायबर हल्ले 'ऑपरेशन सिंदूर' नंतर अधिक तीव्र झाले आहेत. या कालावधीत एकूण 15 लाख सायबर हल्ल्याचे प्रयत्न पाकिस्तान, बांगलादेश आणि इंडोनेशियातील हॅकर टोळ्यांनी केले असून, त्यातील फक्त 150 हल्ले यशस्वी झाल्याची माहिती समोर आली आहे. या कटाच्या मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचण्यासाठी तांत्रिक तपास सुरू असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.