धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असलेल्या पिंपळनेर पश्चिम पट्ट्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अवकाळी पावसाचा जोर सुरू आहे, आणि त्यामुळे नदी नाले देखील तुडुंब भरून वाहू लागले आहेत, आईन उन्हाळ्यामध्ये नदी नाले तुडुंब भरून वाहू लागल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे,
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे बऱ्याच शेतांमध्ये देखील पाणी साचले आहे, परंतु या पावसाचा फायदा शेतकऱ्यांना पेरणीसाठी होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मानला जात आहे.
सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवल्याने आंबेडकर अनुयायी आक्रमकछत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकात आंबेडकर पक्ष संघटनांचे आंदोलन
उपमुख्यमंत्री अजित पवार,मंत्री संजय शिरसाट यांच्या विरोधात आंदोलन
सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी
सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवणाऱ्यांवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी
Pune News: उत्तर पुणे जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवातउत्तर पुणे जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊसाला सुरुवात झाली असुन रस्त्यांवर पाणीच पाणी झालेय तर काही भागात गारांचाही पाऊस सुरुय
मागच्या दोन दिवसांपासून वातावरणात उकाडा जाणवत असताना सकाळपासुन वातावरणात गारवा तयार झाला होता त्यामुळे उकाड्यापासुन दिलासा मिळत असताना पाऊसाची जोरदार बँटिंग सुरु झाली असुन टोमँटो आणि कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भिती शेतकरी व्यक्त करत आहे
Kolhapur News: अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिरात ड्रेस कोडअंबाबाई आणि जोतिबा मंदिरात पारंपारिक पद्धतीने कपडे परिधान करून प्रवेश करा
धार्मिक विधीच्या अनुषंगाने तोकडे कपडे न घालता पारंपारिक पद्धतीने भक्तांनी कपडे परिधान करावेत
मंदिरातील धार्मिकतेचा आदर करून सर्वांनी पारंपारिक पद्धतीने कपडे परिधान करा
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच भाविकांना आवाहन
करवीर निवासिनी अंबाबाई देवस्थान हे साडेतीन शक्तीपीठापैकी एक महत्त्वाचे पीठ असून या मंदिराचे महत्व फार आहे
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने प्रसिद्धीपत्रक जारी करत केलं भक्तांना आवाहन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शहीद जवानांच्या कुटुंबीयांना कॉल...नांदेडच्या देगलूर येथील भूमिपुत्र सचिन वनंजे जम्मू येथे कर्तव्यावर असतांना शहीद झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी त्यांच्या पत्नी माधुरी वनंजे त्याच्याशी फोनवरून संवाद साधत धीर दिला आहे. राज्यसभेचे खासदार अजित गोपछडे यांनी हा संवाद करून दिला आहे. आम्ही सगळे आपल्या कुटुंबाच्या सोबत आहोत आपल्या कुटुंबियाची काळजी घेणं आमच्या कर्तव्य आहे. असं म्हणत माधुरी वनंजे याचं सांत्वन केल आहे.
Pune News: ६ जून पर्यंत मॉन्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता, पुणे वेधशाळेचा अंदाजपुण्यासह राज्यातील बहुतांश ठिकाणी आज पूर्व मॉन्सून पावसाला सुरुवात झाली आहे. येत्या ६ जून रोजी मॉन्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.
२७ मे रोजी केरळ मध्ये मान्सून दाखल होईल तसेच महाराष्ट्रात मॉन्सून ६ जून आसपास येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुण्यात सर्वत्र पावसाची हजेरी: हवामानात गारवा, नागरिकांमध्ये उत्साहगेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असताना आज पुणेकरांना पावसाने दिलासा दिला आहे. शहराच्या सर्वच भागांमध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते आणि दुपारनंतर अनेक भागांत जोरदार पावसाला सुरुवात झाली.
शिवाजीनगर, डेक्कन, कोथरूड, हडपसर, कात्रज, बाणेर, औंध, हिंगणे, पिंपरी-चिंचवड आणि वाघोली या परिसरांत मध्यम ते जोरदार पावसाची नोंद झाली आहे. काही भागांत विजांसह सरी कोसळल्या, ज्यामुळे थोड्या वेळासाठी वीजपुरवठा आणि वाहतूक यंत्रणा काहीशी विस्कळीत झाली.
Nashik News: नाशिक सिटी लिंक बस चालकाचा नियंत्रण सुटल्याने बसची तीन गाड्यांना धडक..सिटी लिंक बस चालकास फिट आल्याने त्याचे नियंत्रण सुटले रस्त्याच्या बाजूला उभे असलेल्या एक दुचाकी सह दोन चारचाकी वाहनांना धडक...
अपघात नंतर नागरिकांची गर्दी वाहतूक कोंडी
अपघातात तिन्ही वाहनांचा नुकसान कोणी ही जखमी नाही....
उल्हास नदीकिनारी चोरट्यांचा सुळसुळाटबदलापुरातल्या उल्हास नदीकिनाऱ्यावर चोरट्यांचा अक्षरशः सुळसुळाट झालाय. या चोरट्यांनी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या पर्यटकांची चारचाकी गाडी फोडत एक लाखाचा ऐवज लंपास केलाय. या चोरट्यांनी एकाच दिवशी दोन पर्यटकांची गाडी फोडल्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालय.
तापमानात प्रचंड वाढ; पोल्ट्री व्यवसायाला मोठा फटकावातावरणातील तापमान ४० शी पार केल्याने उष्माघाताचा धोका वाढत असुन कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढलेय त्यातच अंड्यांचे दरही घसरलेत. या दुहेरी संकटामुळे पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. पक्षांना उष्माघातापासून वाचवण्यासाठी आणि वातावरण थंड ठेवण्यासाठी पाण्याचे फवारे मारून थंडावा देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दहावीचा निकाल आज जाहीर; महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची पत्रकार परिषददहावी बोर्डचा आज निकाल
पुण्यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद
दहावी बोर्ड निकालाच्या अनुषंगाने पुण्यात मंडळाची पत्रकार परिषद
पुण्यात पुन्हा "कोयता वॉर"गाडी जोरात का चालवली या कारणावरून तिघांकडून कोयत्याने मारहाण
पुण्यातील बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटना
केवळ गाडी फास्ट नेण्यावरून फिर्यादी आणि आरोपींमध्ये वाद
आरोपींकडून थेट कोयत्याने मारहाण
बिबवेवाडी पोलिसांकडून तीन आरोपींना अटक
ऋतिक बाबू पवार, ओमकार गव्हाणे, सूरज शिंदे अस अटक आरोपीचे नाव
कोयत्याने मारहाण करतानाच CCTV व्हायरल
पेन्शन नातेवाईकांना दिली म्हणून आईला कुकरने मारले, सोलापुरातील घटनापेन्शन नातेवाईकांना दिल्याने आईला कुकरणे मारल्याची धक्कादायक घटना सोलापुरात उघडकीस आली
विजयालक्ष्मी चिंचणपुरे असे जखमी झालेल्या आईचे नाव
या प्रकरणी जेलरोड पोलिसांनी मुलगा हर्षल चींचणपुरे या संशयित आरोपीला पोलिसांनी केली अटक
अटक करून पोलिसांनी हर्षल चींचणपुरे यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दिली 2 दिवसांची पोलीस कोठडी
सोलापुरातील अन्नपूर्णा संकुल अपार्टमेंट येथे घडली घटना
संशयित आरोपी हर्षल चींचणपुरे हा शिक्षण विभागात लिपिक म्हणून कामाला आहे
थोड्याच वेळात लागणार दहावीचा निकाल११ वाजता दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. विद्यार्थी आणि पालकांमध्ये धाकधूक वाढली आहे.
मुंबई पुर्व उपनगरात पुन्हा पावसाच्या रिमझिम सरी कोसळण्यास सुरुवातमुंबई पुर्व उपनगरात पुन्हा पावसाच्या रिमझिम सरी कोसळण्यास सुरुवात
भांडुप, विक्रोळी, पवई ,घाटकोपर परिसरात रिमझिम पाऊस सुरू
याच दिवशी गेल्या वर्षी घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाला होता
सामंत आणि राज ठाकरे यांच्यात तासभर चर्चाशिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. दोघांमध्ये तासभर चर्चा झाली. शिवसेना आणि मनसे यांच्यातील युतीसंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे बोलले जातेय.
बुलढाण्याला अवकाळीचा तडाखाबुलढाणा जिल्हयात मागील काही दिवसांपासून भाग बदलत अवकाळी पाऊस पडत असून यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे .. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार, जळगाव जामोद, मेहकर, बुलढाणा , सिंदखेड राजा सह परिसरातील तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडला .. तर दोन दिवसांपासून सुद्धा वादळी. वाऱ्यासह अवकाळी पडतोय .. आज सकाळपासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस सुरू असून ढगाळ वातवरण आहे .. त्यामुळे वातावरणात बदल होऊन गारवा निर्माण झाला आहे ..
अवकाळीचा नाशिक जिल्ह्याला मोठा तडाखा- अवकाळीने जिल्ह्यातील ३,८६७ हेक्टरवरील पिकांचं नुकसान
- ६५९ गावातील १५,३३३ शेतकऱ्यांच्या पिकांना अवकाळीचा फटका
- अवकाळीचा सर्वाधिक फटका कांद्याला, आंबा, डाळिंब, टोमॅटो, गहू, मक्यासह भाजीपाला पिकं मातीमोल
- नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे सुरू, दररोज होत असलेल्या अवकाळी पावसामुळे नुकसानीची तीव्रता वाढण्याची शक्यता
- १४ मे पर्यंत नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसाचा इशारा
मराठवाड्यात अवकाळी पावसाचा कहर,मराठवाड्यात वीज पडून 6 जणांचा मृत्यू तर 14 जनावरे दगावली.मराठवाड्यातील अनेक भागात अवकाळी पावसासह झालेल्या गारपिटीचा फटका मराठवाड्यातील अडीच हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांसह फळबागांना बसला आहे.यात जालना जिल्ह्यातील 1 हजार 923 बाधित क्षेत्र आहे. गेल्या महिन्यातही अवकाळी पावसामुळे 3 हजार 36 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते .नुकसानीचा अंतिम अहवाल अद्याप शासनाकडे गेलेला नाही. दरम्यान मराठवाड्यात वीज पडून सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर 14 जनावरे देखील दगावली आहेत. मे महिन्यांतील पैकी 7 दिवस
अवकाळी पावसाने हजेरी लावली. वादळी पावसामुळे मक्यासह अन्य उन्हाळी पिकांना फटका बसला. तसेच फळबागादेखील बाधित झाल्या आहेत. प्राथमिक अहवालानुसार, विभागातील १७ हेक्टर जिरायत क्षेत्र, १ हजार ४८० हेक्टरवरील बागायत आणि १ हजार १८ हेक्टरवरील फळपिकांना फटका बसला आहे.
पुण्यात चार दिवस येलो अलर्टपुणे शहरात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पुणेकरांना उन्हाळ्याच्या झाळापासून काहीसा दिलासा मिळाला आहे
तर पुढील चार दिवसात कमाल तापमानामध्ये किंचित घट होणार असून
मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे
त्यामुळे पुणे शहराला पुढील चार दिवस येलो अलर्ट देण्यात आलाय....
मनसे अध्यक्ष राज ठाकरे २ दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर- १५ आणि १६ मे ला राज ठाकरे नाशकात
- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज यांचा नाशिक दौरा महत्वाचा
- आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी राज काय कानमंत्र देणार, पाहणं महत्वाचं
- राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या गेल्या काही दिवसांपासून चर्चा
- उद्धव ठाकरेंपाठोपाठ राज ठाकरे देखील नाशिक दौऱ्यावर
- राज ठाकरेंच्या नाशिक दौऱ्यात शिवसेना ठाकरे गट, मनसेच्या युतीसंदर्भात आढावा घेतला जाण्याची शक्यता
विदर्भ क्रिकेट असोसिएशनला 4 कोटी 56 लाख रुपयांच्या वसुलीच्या नोटीसला हायकोर्टाची अंतरिम स्थगिती- व्हीसीएसबाबत नागपूर तहसीलदार यांनी बजावलेली नोटीस अवैध असल्याचा दावा
- विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर झालेल्या विविध क्रिकेट मॅचच्या पोलीस बंदोबस्ताच्या शुल्क वसुलीसाठी बजावली होती नोटीस
- शहर तहसीलदारांनी विदर्भ क्रिकेट असोसिएशनला ही नोटीस बजावली होती, नोटीसला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिली अंतरिम स्थगिती
- २५ जूनपर्यंत तहसीलदार, जिल्हाधिकारी आणि महसूल सजीवांना उत्तर सादर करण्याचे नागपूर खंडपीठाचे आदेश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक उद्यानास भेटमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बॅचलर रोड वर्धा येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक उद्यानास भेट दिली व त्यांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन केले.कार्यक्रमाच्या सुरूवातीला स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवन कार्यावर आधारित शिल्प प्रदर्शनीची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्मरणिकेचे विमोचन करण्यात आले. या स्मरणिकेमध्ये राज्यातील प्रसिद्ध लेखकांचे लेख, सामाजिक संस्थेद्वारे राबविण्यात येणारे विविध कार्यक्रमांचे छायाचित्र आदींचा समावेश आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्वातंत्र्याच्या लढ्याला एक वेगळी कलाटणी दिली. सावरकरांनी स्वातंत्र्यवीर म्हणून तर काम केलेच सोबतच अनेक क्रांतीकारक तयार केले. दोन काळ्या पाण्याच्या शिक्षा एकत्रित झालेला स्वातंत्र्य इतिहासातला एकमेक नायक म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत, अशा थोर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वर्धा येथे उभारलेल्या स्मारकाच्या माध्यमातून नवीन पिढीलाही प्रेरणा मिळेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
कडक उन्हामुळे पुणे विभागातील चारही जिल्ह्यांमध्ये पिण्याच्या पाण्यावर परिणामपुणे विभागात २१३ टँकरच्या माध्यमातून १ हजार २४९ वाड्या, २०८ गावे, ३ लाख ७० हजार नागरिक आणि २ लाख ६५ हजार जनावरांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
पुणे विभागातील सर्वाधिक ८३ टँकर पुणे जिल्ह्यात सुरू असून, आंबेगाव तालुक्यात तालुक्यात ४१ हजार ४४० नागरिकांना २१ टँकरच्या मदतीने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
तर, तालुकानिहाय संख्या लक्षात घेता सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात ५१ टँकरच्या साहाय्याने ७१ हजार ७५० नागरिक आणि ४९ हजार जनावरांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाचा तडाखा- रात्री त्र्यंबकेश्वरमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस
- अवकाळीमुळे शहरातील रस्ते पाण्याखाली, सखल भागात साचलं पाणी
- वीजपुरवठा देखील खंडित झाल्यानं भाविकांसह नागरिकांना मनस्ताप
- पुढील काही दिवस नाशिकला पावसाचा अलर्ट कायम
एसएससी बोर्डाच्या इयत्ता दहावीचा निकाल आज दुपारीबोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी हे आज सकाळी पुण्यात पञकार परिषद घेऊन हा निकाल जाहिर करतील.
यंदा 16 लाख 11 हजार 610 विद्यार्थी या शालांत परिक्षेला बसले होते
दुपारी एक वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट वर पालकांना आणि मुलांना हा निकाल पाहता येईल
मान्सून आज अंदमान-निकोबार बेटावर धडक मारण्याची शक्यतादक्षिण बंगालच्या उपसागरातले नैरूत्य मोसमी वारे हा पहिला पाऊस घेऊन येतील. हवामान खात्यानेच हा अंदाज वर्तवलाय..यंदा मान्सूनचं आगमन आठवडाभर आधीच होतंय
कांद्याचे दर घसरले,कांदा उत्पादक शेतकरी आर्थीक संकटातधाराशिव जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी आर्थीक संकटात सापडलाय.उन्हाळी कांदा काढणीला आल्यावर अवकाळीचा तडाखा बसला यामध्ये बहुतांश शेतकऱ्यांचा कांदा भिजल्याने नुकसान झाल आणि त्यातच जो कांदा निघाला तो विक्री करण्याची वेळ आल्यावर कांद्याचे दर घसरले आहेत.दोन महीन्यापुर्वी 40 रुपये किलो असलेला कांद्याचा दर 10 रुपये प्रति किलोवर आला आहे.त्यामुळे लागवडीचा खर्च देखील निघत नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.ऐकीकडे गृहीणींना दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांच्या डोळ्यात मात्र पाणी आल आहे.त्यामुळे कांद्याला किमान २५ ते ३० रुपये दर मिळावा अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांतुन केली जात आहे
यवतमाळ जिल्ह्यात अनेक भागात अवकाळी पावसाला सुरूवातयवतमाळ जिल्ह्यामध्ये गेल्या तीन दिवसांपासून ढगाळी वातावरण असताना. रविवारी मध्यरात्री दरम्यान पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली.आज सकाळपासून वादळ वाऱ्यासह विजेंचा कडकडाटतात पुन्हा अवकाळी पावसाने जिल्ह्यातील काही भागांमध्ये सुरुवात झाली केली असून या पावसामुळे खरीप हंगामाच्या कामाला वेग येणार आहे. शेवटच्या टप्प्यात काढण्यासाठी आलेला भुईमूग या पिकाला काही प्रमाणात फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
उन्हाचा ‘ताप’ कमी! ढगाळ, पावसाळी हवामान १७ मेपर्यंत कायम राहण्याची चिन्हेगेल्या काही दिवसांपासून असलेले ढगाळ, पावसाळी हवामान येत्या १७ मेपर्यंत कायम राहण्याची चिन्हे आहेत. ढगाळ, पावसाळी हवामानामुळे कमाल आणि किमान तापमानात घट झाली असून, यंदाच्या मे महिन्याचा पूर्वार्ध तापमानाच्या दृष्टीने सुसह्य ठरला आहे.
Pune : पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांवर आता कारवाईदंड आणि नळजोडही तोडण्याचा पुणे महापालिकेचा विचार
शहरात ज्या भागात पिण्याच्या पाण्याचा वापर गाड्या धुणे, बागकाम तसेच रस्ते धुण्यासाठी केला जातो, तेथील नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तरीही सुधारणा न झाल्यास प्रसंगी त्यांचा नळजोड तोडण्यात येणार आहे.
शहरातील सर्व भागांतील नागरिकांना समान आणि पुरेसे पाणी मिळावे, यासाठी महापालिकेने समान पाणीपुरवठा योजना सुरू केली आहे. योजनेचे काम अनेक भागांमध्ये ९० टक्के पूर्ण झाले असून, तेथे महापालिकेने मीटर बसविले आहेत. त्यामुळे कोणत्या भागात किती पाणी जाते, याची माहिती महापालिकेला मिळत आहे.
पुणे शहरात आता एसी स्वच्छतागृहेपुणे महापालिकेचा प्रस्ताव; प्रसाधनगृह, वायफायसह इतर आधुनिक सुविधा
कामानिमित्त दिवसभर घराबाहेर असलेल्या नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेने वातानुकुलित (एसी) स्वच्छतागृहे उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
शहराच्या प्रवेशद्वारांजवळ, तसेच पुणे स्टेशन परिसरात ही स्वच्छतागृहे उभारण्यात येणार असून, याचा उपयोग प्रामुख्याने महिलांना होणार आहे.
या स्वच्छतागृहांसाठी महापालिकेने प्रस्ताव मागविले आहेत. या स्वच्छतागृहांमध्ये वायफाय, मोबाइल आणि लॅपटॉप चार्जिंग सुविधा असणार आहे. नागरिकांना ठरवीक शुल्क भरून स्वच्छतागृहाचा वापर करता येणार आहे. शहरात दररोज हजारो नागरिक नोकरी, व्यवसायानिमित्त घराबाहेर पडतात. शहरात महापालिकेच्या वतीने अनेक भागांत नागरिकांसाठी स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, त्याची स्वच्छता योग्य पद्धतीने केली जात नसल्याने त्याचा फारसा वापर केला जात नाही.
ऑल द बेस्ट... आज दहावीचा निकालआज दहावीचा निकाल, विद्यार्थी आणि पालकांमध्ये धाकधूक वाढली
- नागपूर विभागात 679 केंद्रावरून 1 लाख 51 हजार 379 विद्यार्थ्यांनी दिली होती परीक्षा
- सर्वाधिक विद्यार्थी 58 हजार 495 विद्यार्थी नागपूर जिल्हयातील
- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर पाहता येणार निकाल..
पंढरपुरात पावसाच्या सरीपंढरपुरात रात्री अवकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.अचानक आलेल्या पावसामुळे भाविकांची एकच तारांबळ उडाली. पंधरा ते वीस मिनीटे झालेल्या पावसामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झाले.
पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे . मागील दिवसांपासून उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे.
अध्यात्म शक्तीमुळे आपण पाकिस्तानसह अनेकांना धडा शिकवू शकतो - शिंदेअध्यात्मामुळे आपण पाकिस्तानसह अनेकांना धडा शिकवू शकतो असे विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बुलढाण्यात केलं. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील इसरोळ येथे गीता परिवारातर्फे पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख उपस्थित होते. यावेळी आपल्या देशात अध्यात्म शक्ती आहे अध्यात्मामुळे अनेक समस्यांचं सोल्युशन निघत असेही ते म्हणाले.
दुचाकी आणि चार चाकी वाहनाची समोरासमोर धडक,दुचाकीस्वार तरुण ठारसांगलीच्या मिरजेमध्ये चार चाकी दुचाकीचा भीषण अपघात झालेला मध्ये दुचाकी स्वार करून ठार झालाय जमीर मुजावर व 27 असे या तरुणाचं नाव आहे.
रत्नागिरी-नागपूर महामार्गावर मिरज कोल्हापूर दरम्यान अपघात झाला आहे. दुचाकीस्वार तरुण हा विरुद्ध दिशेने जात असताना समोरून येणाऱ्या भरधाव चार चाकी वाहनाला जोरदार जाऊन धडकला, यामध्ये समोरासमोर धडक झाल्याने दुचाकीस्वर तरुण जमीर मुजावर हा रस्त्याच्या कडेला जाऊन पडला,ज्यामध्ये तो जागीच ठार झाला.घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी धाव घेतली होती.
रविकांत तुपकर घराच्या अंगणातच कुटुंबासह करणार उपोषण
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा आज १३ मे रोजी जन्मदिवस असून तूपकरांचा वाढदिवस दरवर्षी अतिशय साध्या पद्धतीने साजरा होतो.. तुपकर यांना भेटण्यासाठी अनेक शेतकरी चाहते येत असतात शुभेचा देत असतात .. मात्र यावेळी रविकांत तुपकर आंदोलनात्मक पद्धत्तीने जन्मदिवस समर्पित करणार आहेत.. तुपकर चाहत्यांना भेटतील पण, कोणतेही बॅनर लावू नका, पुष्पगुच्छ आणू नका, असे आवाहन तुपकर यांनी केले आहे.. आज जन्मदिवसाच्या रोजी सकाळी ९ वाजेपासून ते रात्री ९ वाजे पर्यंत रविकांत तुपकर त्यांच्या घराच्या अंगणात सहकुटुंब अन्नत्याग करणार आहेत.. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसह इतर मागण्यांवर सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न यानिमित्ताने करण्यात येणार आहे.. तर पहेलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ भारतीयांचा मृत्यू झाला, त्यानंतर झालेल्या युद्धात भारतीय जवानांनी पराक्रम गाजवत पाकिस्तानला गुडघे टेकण्यास भाग पाडले.. मात्र यात देखील काही जवानांसह सीमेवरील गावातील काही नागरिकांचा मृत्यू झाला.. शहीद भारतीय जवानांसह नागरिकांना आदरांजली वाहण्यासाठी देखील तुपकर व त्यांचे कुटुंबीय एक दिवशीय उपवास करणार आहेत..