Jalgaon Crime News : नशेसाठी पत्नीवर कोयत्याने हल्ला
esakal May 13, 2025 09:45 PM

जळगाव- शहरातील राजीव गांधी नगर परिसरातील ५० वर्षीय महिलेवर पतीने कोयत्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली. नशेसाठी पैसे देत नाही म्हणून पतीने मारहाण केल्याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजीव गांधीनगर परिसरात संगीता रमेश झेंडे (वय ५०) ही विवाहिता कुटुंबीयांसह वास्तव्यास आहे. रविवारी (ता.११) दुपारी पती रमेश बाबासाहेब झेंडे याने पत्नी संगीताकडे पैशांची मागणी केली.

नशा करण्यासाठी पत्नी पैसे देत नसल्याने रमेश झेंडे याने लाकडी दांड्यासह कोयत्याने हल्ला करुन पत्नी संगीताला जखमी केले. जखमी महिलेच्या तक्रारीवरुन रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस कर्मचारी प्रवीण जगदाळे तपास करीत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.