मंगळवेढा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत परीक्षेचा (इयत्ता दहावी) तालुक्याचा निकाल 93.53 टक्के इतका लागला असून, बारावीच्या निकालाप्रमाणे दहावीच्या निकालात देखील घट झाली असून गतवर्षी दहावीच्या निकालाच्या तुलनेत यंदाच्या निकालात पाच टक्क्यांनी घटला. इंग्लिश स्कूलची आश्लेषा शिवाजी भोसले 98.20% गुण घेऊन तालुक्यात पहिली आली.
या परीक्षेसाठी तालुक्यातून 3 हजार 324 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. त्यापैकी 3 हजार 277 विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र ठरले. 749 विद्यार्थी विशेष प्रावीण्य घेऊन उत्तीर्ण झाले. 1052 विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर 976 विद्यार्थी द्वितीय तर 288 तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. असे एकूण 3 हजार 65 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांमध्ये मुलींचा टक्का हा सर्वाधिक राहिला. यंदा परीक्षा मंडळांनी कॉफीमुक्त परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले चा परिणाम या निकालावर दिसून आला त्या निकालात सात टक्के पाच टक्के घट झाले तर गतवर्षी 27 शाळाचा शंभर टक्के निकाल शंभर टक्के लागला यंदा त्यामध्ये 11 शाळांचा निकाल शंभर टक्के लागला महाराणी ताराबाई गर्ल्स हायस्कूलचा निकाल कमी तर 11 शाळांचे निकाल शंभर टक्के लागला आहे.
शाळानिहाय निकालाची टक्केवारी इंग्लिश स्कूल, मंगळवेढा 94.72, नूतन प्रशाला, बोराळे 89.52, हनुमान विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, मरवडे 98.93, जवाहरलाल शेतकी हायस्कूल 91.83, विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सलगर बुद्रुक 94.94 , इंग्लिश स्कूल, भोसे 92.52, विद्यामंदिर हायस्कूल, लक्ष्मी दहिवडी 90.90, सिद्धेश्वर विद्यामंदिर, माचणूर 96.38, बाळकृष्ण विद्यालय, नंदेश्वर 93.26, माध्यमिक आश्रमशाळा, बालाजीनगर 83.67, माध्यमिक आश्रमशाळा, हुन्नूर 93.33, कै. दत्ताजीराव भाकरे प्रशाला, आंधळगाव 90.90, संगम विद्यालय, डोंगरगाव 81.25, महाराणी ताराबाई गर्ल्स हायस्कूल, मंगळवेढा 43.75,
कामसिद्ध विद्यालय, खुपसंगी 95, महालिंगराया हायस्कूल, हुलजंती 86.53,महासिद्ध विद्यामंदिर, डोणज 97.50, सिद्धनाथ विद्यालय, लेंडवे चिंचाळे 95.74, स्वामी विवेकानंद विद्यालय, गुंजेगाव 97.87, मातृलिंग हायस्कूल, सिद्धापूर 82.35,माध्यमिक आश्रमशाळा येड्राव खवे 93.40,स्वामी विवेकानंद विद्यालय, गोणेवाडी 90, जुनोनी माध्यमिक विद्यालय, जुनोनी 82.23, गणेश विद्यालय, गणेशवाडी 83.33, शरद पवार विद्यालय, शरदनगर 91.83,शरदचंद्रजी कृषी विद्यालय, मारापूर 97.29;विलासराव देशमुख प्रशाला, कारखाना साईट 82.33,माध्यमिक शाळा, अरळी 88.88;, वेताळ विद्यामंदिर, शिरशी 90,सदगुरू बागडे महाराज विद्यालय, बावची 98.75; कै. लक्ष्मण दादा आकळे विद्यालय, हाजापूर 96.25; एम. पी. मानसिंगका विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, सोड्डी 95.08; केंद्रीय निवासी विद्यालय, तळसंगी 84.28, नूतन मराठी विद्यालय 98.36, माध्यमिक आश्रम शाळा, पडोळकरवाडी 85.18,रेवणसिद्ध स्वामी विद्यामंदिर तळसंगी 97.56; छत्रपती शिवाजी विद्यामंदिर, खोमनाळ 96.29;शरणबसवेश्वर विद्यामंदीर नंदूर 90.32,संत दामाजी हायस्कूल मंगळवेढा 97.43,शारदा सिद्धनाथ विद्यालय, पाटखळ 96.87; ज्ञानदीप विद्यालय मंगळवेढा 98.07.
१०० टक्के निकालाच्या शाळालक्ष्मीदेवी विद्या मंदिर रड्डे, कै. बाबूराव जाधव प्रशाला, धर्मगाव; ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल, मंगळवेढा; उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, मंगळवेढा; सर्वोदय विद्यालय, शिवणगी; भैरवनाथ विद्यालय, शिरनांदगी; कै. श्रीपतराव माने विद्यालय, लवंगी; बाळकृष्ण विद्यालय, भाळवणी; इंग्लिश स्कूल, निंबोणी; जवाहरलाल उर्दू हायस्कूल मंगळवेढा; विद्यानिकेतन विद्यालय जालीहाळ -हिवरगाव