कृषी, अन्न व्यवसाय क्षेत्रासंबंधी मोफत वेबिनार
पुणे, ता. १३ : कृषी क्षेत्रातील उद्योजकता आणि अॅग्री-बिझनेस कौशल्यावर आधारित एक विशेष मोफत वेबिनार येत्या २५ मे रोजी आयोजित करण्यात आला आहे. हा वेबिनार विशेषतः अॅग्री-प्रेन्युअर्स, विद्यार्थी, कृषी व्यवसायात रस असणारे व्यावसायिक आणि निर्यात क्षेत्रात संधी शोधणाऱ्यांसाठी आहे. सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत झूम प्लॅटफॉर्मवर होणाऱ्या या वेबिनारमध्ये उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ आणि अतिथी वक्ते मार्गदर्शन करणार आहेत. कृषी व्यवसायातील सध्याच्या आणि भविष्यातील संधींवर आधारित विविध विषयांची चर्चा या वेळी होणार आहे.
वेबिनारमध्ये शेती निर्यात आणि आयात, व्यवसाय संचालन, वित्त व्यवस्थापन, अन्न व कृषी स्टार्टअप्स, जर्मन भाषा प्रशिक्षण, इंटरनेट ऑफ थिंग्स, ड्रोन, रोबोटिक्स, प्रिसीजन शेती यासारख्या तंत्रज्ञानांचा उपयोग, डिजिटल साधने, अन्नप्रक्रिया व पॅकेजिंग, मानव संसाधन व्यवस्थापन, ई-मार्केटप्लेस, डिजिटल मार्केटिंग आणि पुरवठा साखळी यावर सखोल मार्गदर्शन दिले जाणार आहे. तसेच उत्पादन मार्केट सर्व्हे, ब्रँडिंग, ग्राहक संबंध व्यवस्थापन, व्यवसाय नियम आणि अनुपालन यासारख्या महत्त्वाच्या बाबींवरही चर्चा होणार आहे. हा वेबिनार विद्यार्थ्यांसाठी, उद्योजकांसाठी, नोकरी शोधणाऱ्यांसाठी आणि अॅग्री-टेकमध्ये रस असणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. संबंधित क्षेत्रात यशस्वी भवितव्य घडवण्यासाठी ही एक उत्तम संधी असून, इच्छुकांनी वेळीच नोंदणी करावी, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.
हे लक्षात ठेवा
वेबिनार दिनांक : २५ मे २०२५, रविवार
वेळ: सकाळी ११:०० ते दुपारी १:००
माध्यम : ऑनलाइन (ZOOM प्लॅटफॉर्म)
नावनोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क: ८९५६३४४४७२, ९१४६०३८०३१
क्यूआर कोड :