घोडविंदे पाडा पुलाची उंची वाढवण्याची मागणी
esakal May 13, 2025 11:45 PM

वाडा (बातमीदार) : तालुक्यातील घोडविंदे पाडा या गावाच्या नाल्यावर एक छोटासा पूल असून त्याची उंची कमी असल्याने पावसाळ्यात पुराचे पाणी पुलावरून जाऊन या गावाचा संपर्क तुटतो. त्यामुळे या पुलाची उंची वाढावा, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. घोडविंदे पाडा हे गाव मुसारणे ग्रामपंचायतीच्या हद्दीत येते. या पाड्यालगत मानपाडा असून या दोन्ही पाड्यांची वाहतूक घोडविंदे पाडा-मेट या रस्त्यावरून होते. या रस्त्यावर एक पूल असून त्याची उंची कमी आहे. त्यामुळे पुरातही या पुलावरून पाणी जाऊन येथील वाहतूक बंद होते. या रस्त्यावर चार ते पाच कंपन्या असून या कंपन्यातील कामकाजही पुराच्या पाण्यामुळे बंद होते. त्यामुळे त्यांचेही लाखोंचे नुकसान होते. याशिवाय विद्यार्थी, नोकरदार वर्ग व शेतकरी यांचेही नुकसान होते. या ठिकाणी नवीन पुलाची उभारणी करावी, म्हणून नागरिकांनी बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधींकडे मागणी केली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.