
पहलगाम हल्ल्यानंतर ओमर अब्दुल्ला यांनी कश्मिरमधील नागरिकांवर झालेल्या दुर्लक्षाबद्दल निराशा व्यक्त केली आहे. पहलगाम नंतर आॅपरेशन सिंदुर अंतर्गत हिंदुस्थान सरकारने पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या. परंतु याच घडामोडीत पाकिस्तानच्या सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारात अनेक कश्मिरी नागरीक मरण पावले. या नागरिकांकडे सरकार लक्ष देत नसल्याचं ओमर अब्दुल्ला यांना इंडिया टुडेशी बोलताना म्हटलं आहे.
जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मंगळवारी पहलगाममधील अलिकडच्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर “संताप” असे म्हणत टीका केली. पाकिस्तानच्या सीमेपलीकडून होणाऱ्या गोळीबारामुळे होणाऱ्या नागरिकांच्या मृत्यूंकडे देशाने लक्ष न दिल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. अब्दुल्ला म्हणाले की, पहलगाम हल्ल्यात 26 पर्यटकांच्या मृत्युवर देशाने योग्यरित्या शोक व्यक्त केला आहे. असे असले तरी, जम्मू आणि काश्मीरमध्ये सीमेपलीकडून होणाऱ्या गोळीबारात झालेल्या जीवितहानीकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केले जात आहे.
पहलगाममध्ये घडलेल्या 26 निष्पाप पर्यटकांबद्दल देशात उत्स्फूर्तपणे संताप व्यक्त होताना दिसला. परंतु पाकिस्तानच्या सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या काश्मिरींबद्दल पुरेसे बोलले जात नाही याबद्दलही निराशा व्यक्त केली जातेय. अब्दुल्ला म्हणाले, ”धार्मिक सीमा ओलांडून विविध जिल्ह्यांमध्ये नागरिक आणि लष्करी जीवितहानी झाली आहे. आम्ही राजौरी, पूंछ, उरी, बारामुल्ला येथे लोक गमावले आहेत. आम्ही मुस्लिम, हिंदू, शीख गमावले आहेत. आम्ही नागरिक आणि लष्करी कर्मचारी गमावले आहेत. गुरुद्वारा आणि मंदिरे उद्धवस्त झाली आहेत तर, आम्ही पुंछमधील मदरसे सुद्धा गमावले आहे.”
22 एप्रिलला पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर कश्मिर अक्षरशः कोलमडले. पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्यामुळे, बहुतांशी पर्यटकांनी कश्मिरकडे पाठ वळवली. त्यामुळे कश्मिरच्या अर्थव्यवस्थेला उतरती कळा लागली आहे. त्यात आॅपरेशन सिंदूरनंतर तर कश्मिर जगाच्या पटलावर अधिक ठळकपणे मलिन झालेले आहे.