Latest Maharashtra News Updates : सर्वोच्च न्यायालयाचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून न्या. भूषण गवई आज कार्यभार स्वीकारणार
esakal May 14, 2025 01:45 PM
Mahavitaran Engineer : महावितरण अभियंत्याला इचलकरंजीत लाच घेताना पकडले

इचलकरंजी : येथील एका अपार्टमेंटमध्ये १८ वीज जोडण्या देण्यासाठी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याला ३० हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले. प्रशांत ताराचंदजी राठी (वय ४९, रा. उपकार रेसिडेन्सी, सांगली रोड, इचलकरंजी, मूळ रा. धामणगाव, ता. धामणगाव, जि. अमरावती) असे त्यांचे नाव आहे.

Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या 'रेझिस्टन्स फ्रंट'चा प्रमुख शाहिद कुट्टे ठार

जम्मू : गुप्तचरांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर भारतीय जवानांनी आज जम्मू-काश्मीरमधील शोपियाँमध्ये केलेल्या कारवाईत तीन दहशतवादी मारले गेले. यापैकी दोघे जण लष्करे तैयबा या दहशतवादी संघटनेचे सदस्य असून तिसऱ्या दहशतवाद्याची ओळख पटलेली नाही. मात्र, हा दहशतवादी म्हणजे पहलगाम हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ या संघटनेचा प्रमुख शाहिद कुट्टे असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Ambabai, Jyotiba Temple : अंबाबाई, जोतिबा मंदिरात पारंपरिक वेशभूषेतच प्रवेश, आजपासून होणार निर्णयाची अंमलबजावणी

कोल्हापूर : येथील करवीर निवासिनी श्री अंबाबाई व जोतिबा मंदिरात आता भाविकांना पारंपरिक वेशभूषेतच प्रवेश देण्याचा निर्णय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने घेतला आहे. आज (ता. १५) पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. मंदिर परिसरात काही भाविक तोकड्या कपड्यांत प्रवेश करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर हा निर्णय घेतल्याचे देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी सांगितले.

Bhushan Gavai : सर्वोच्च न्यायालयाचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून न्या. भूषण गवई आज कार्यभार स्वीकारणार

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून न्या. भूषण गवई हे आज (ता. १४) कार्यभार स्वीकारणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. महाराष्ट्रीय असलेले गवई हे अनुसूचित जातींचे प्रतिनिधित्व करणारे दुसरे सरन्यायाधीश ठरणार आहेत. या वर्गाचे प्रतिनिधित्व करण्याचा पहिला बहुमान आधी सरन्यायाधीश न्या. के. जी. बालकृष्णन यांना मिळाला होता. २००७ ते २०१० याकालावधीत त्यांनी काम पाहिले होते. न्या. गवई यांना सहा महिन्यांचा कार्यकाळ मिळणार आहे.

PM Modi : 'दहशतवादाविरोधात लक्ष्मण रेषा आखलीये, आता पुन्हा हल्ला झाल्यास सडेतोड प्रत्युत्तर देऊ' -पंतप्रधान नरेंद्र मोदी

Latest Marathi Live Updates 14 May 2025 : ‘‘दहशतवादाविरोधात आम्ही लक्ष्मण रेषा आखली असून आता पुन्हा हल्ला झाल्यास सडेतोड प्रत्युत्तर देऊ. ऑपरेशन सिंदूर ही आमच्यासाठी सामान्य स्थिती आहे. पाकिस्तानमध्ये कोठेही दहशतवादी शांततेत राहू शकणार नाहीत, घरामध्ये घुसून त्यांना ठेचले जाईल.’’, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा पाकिस्तानचे वाभाडे काढले. तसेच व्यापार रोखण्याच्या धमकीमुळेच भारत पाकिस्तानचा संघर्ष थांबला हा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा भारताने स्पष्ट शब्दांत फेटाळून लावला. कोल्हापूर येथील करवीर निवासिनी श्री अंबाबाई व जोतिबा मंदिरात आता भाविकांना पारंपरिक वेशभूषेतच प्रवेश देण्याचा निर्णय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे घेण्यात आला आहे. आजपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून न्या. भूषण गवई हे आज कार्यभार स्वीकारणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. नैॡत्य मोसमी वाऱ्यांचे (मॉन्सून) मंगळवारी अंदमानात आगमन झाले आहे. दक्षिण बंगालचा उपसागर, निकोबार बेटे आणि अंदमान समुद्रात मॉन्सून दाखल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. त्याचबरोबर राज्यातील वातावरणात बदल पहायला मिळत आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.