महाराष्ट्र राजकारण एनसीपी: गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा जोरदार चर्चा सुरु आहे. शरद पवार यांच्या एका वक्तव्यामुळे ही सगळी चर्चा सुरु झाली होती. मात्र, अजित पवार यांनी मंगळवारी झालेल्या आमदारांसोबतच्या बैठकीत शरद पवार गट (Sharad Pawar) आणि आपल्यात एकत्र येण्याची कोणतीही चर्चा सुरु नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे शरद पवार गट आणि अजितदादा गट (Ajit Pawar) एकत्र येणार का, याचे उत्तर आणखी लांबणीवर पडले आहे. परंतु, नेमक्या याचवेळी शरद पवार गटात फेरबदलाच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व फ्रंटलसेलचे प्रमुख बदलण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. आजच्या पक्षाच्या कार्यकारणीच्या बैठकीत चर्चा पार पडल्यानंतर येत्या दोन दिवसांत पक्षातील बदल समोर येतील. पक्षांतर्गत होऊ घातलेल्या बदलात रोहित पवारांची मर्जी राखली जातेय का? ज्यांना फ्रंटल सेलचे प्रमुख पद घेऊन कमी कालावधी झाला आहे, त्यांनादेखील बदललं जातंय की पुन्हा त्यांच्याकडे जबाबदारी दिली जातेय, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
गेल्या काही काळापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रोहित पवारांना डावलले जात असल्याची बाब समोर आली होती. रोहित पवार यांनी वेळोवेळी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे याविषयीची नाराजीही बोलून दाखवली होती. त्यामुळे नव्याने होऊ घातलेल्या बदलात रोहित पवार यांच्या खांद्यावर जबाबदारी दिली जातेय का, हे पाहण महत्वाचे राहील.
१) मेहबूब शेख- युवा राज्य अध्यक्ष
2) सुनील गव्हाणे- विद्यार्थी अध्यक्ष
3) विद्यार्थिनी प्रदेशाध्यक्ष- पद खाली
4) सर्व प्रवक्ते – पद खाली
5) अल्पसंख्याक अध्यक्ष- पद खाली
१) महिला प्रदेशाध्यक्ष- रोहिणी खडसे ( दीड वर्षाचा कार्यकाळ)
२) राज राजापूरकर- ओबीसी सेल अध्यक्ष (दीड वर्ष)
३) सामाजिक न्याय- पंडित कांबळे ( 1 वर्ष)
अजित पवार यांनी नुकत्याच झालेल्या एका बैठकीत आपल्या पक्षातील आमदारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, सध्या दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत वरिष्ठ पातळीवर कोणतीही चर्चा नाही. आगामी निवडणुकांमुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत गेले पाहिजे, अशी काही आमदारांची भूमिका आहे. त्यामुळे पक्षातील गळती थांबवण्याच्या अनुषंगाने शरद पवारांकडून अशाप्रकारची वक्तव्यं आली असतील, असे मत अजित पवार यांनी बैठकीत मांडले होते.
https://www.youtube.com/watch?v=enwlmfi1bcg
आणखी वाचा
मुंबईत राजकीय घडामोडींना वेग, शिवसेना ठाकरे गटाचे आमदार शरद पवारांच्या गाडीत, सिल्वर ओकवर खलबतं
अधिक पाहा..