'कोण होतीस तू, काय झालीस तू' मध्ये तो क्षण आलाच; कावेरीच्या गाडीचा होणार अपघात, प्रोमो पाहून नेटकरी म्हणाले-
esakal May 14, 2025 07:45 PM

छोट्या पडद्यावर गेल्या काही महिन्यात अनेक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. त्यात स्टार प्रवाहच्या देखील काही मालिका आहेत. त्यातलीच एक मालिका म्हणजे 'कोण होतीस तू, काय झालीस तू'. या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांची मनं जिंकली. सुरुवातीपासूनच या मालिकेने प्रेक्षकांची उत्सुकता टिकवून ठेवलीये. लोकप्रिय अभिनेत्री गिरीजा प्रभू आणि मंदार जाधव यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या मालिकेत आता नवीन ट्विस्ट आला आहे. आतापासून खऱ्या मालिकेला सुरुवात झालीये असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे.

सध्या मालिकेत काय सुरू आहे?

मालिकेत सध्या कावेरीच्या लग्नाचा ट्रॅक सुरू आहे. कावेरीचं मंदारसोबत लग्न होणार आहे. मात्र तो त्यांना फसवून तिच्याशी लग्न करतोय. मंदार हा दिगंबरचा मुलगा आहे हे सत्य आता कावेरीला समजणार आहे. त्यामुळे ती त्याच्यासोबतच लग्न मोडतेय. मात्र दुसरीकडे तिच्या वडिलांनादेखील हे माहीत पडतं. त्यामुळे ते मंदारच्या नावावर जमीन करून देण्यास नकार देतात. त्यामुळे मंदार त्यांना जीवे मारणार आहे. त्याचं दुःखात कावेरी तिच्या बहीण आणि भावोजींसोबत त्यांच्या घरी जायला निघतेय.

काय दाखवलंय प्रोमोमध्ये

वडील गेल्यानंतर बहिणीसोबत तिच्या सासरी निघालेली कावेरी चिकूसोबत पुढच्या सीटवर बसलेली दाखवण्यात आलीये. मात्र अचानक वळणाच्या रस्त्यावर त्यांच्या गाडीसमोर एक ट्रक येतो आणि गाडीचा अपघात होतो. या अपघातात कावेरी चिकूसोबत बाहेर फेकली जाते. तर तिची बहीणही झाडाला अडकते. मात्र तिच्या भावोजींचा मृत्यू होतो. गाडी थेट खोल दरीत कोसळते. दुसरीकडे कावेरी आणि चिकू ठीक असतात. तेवढ्यात तिला तिची बहीण दिसते. झाडाला लटकलेली कावेरीची बहीण चिकूला तिच्या स्वाधीन करून झाडाचा हात सोडते आणि दरीत पडते.

हा प्रोमो पहाऊन नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्यात. एकाने लिहिलं, 'आता खरी मालिका सुरू झालीये. दुसऱ्याने लिहिलं, 'कमाल ट्रॅक सुरू केलाय.' आणखी एकाने लिहिलं, 'आता खऱ्या अर्थाने टीआरपी ब्रेक होणार.' एकाने लिहिलं, 'कशाला मारलंय रे चिकुच्या आईला शेवटी आईही आई असते. प्रोमो बघुन खुप वाईट वाटलं चिकुसाठी.' अशा कमेंट करत प्रेक्षकांनी मालिकेच्या पुढील ट्रॅकचं कौतुक केलंय.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.