Maharashtra Today Live Updates: करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात पुणे एटीएस पथक दाखल
Saam TV May 14, 2025 08:45 PM
Kalyan: कल्याण पूर्वेकडील पूना लिंक रोड झालाय अपघाताचा हॉट स्पॉट

कल्याण पूर्वेकडील पूर्ण लिंक रोडवर चक्की नाकाच्या दिशेने जाणारा डंपरचे नियंत्रण सुटल्याने डंपरने थेट डिव्हायडरला धडक दिली . सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही . या अपघातात या अपघातात डिव्हायडरवरील लाईटचा पोल कोसळला आहे डंपर चालकाचे डंपर वरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक माहिती समोर येत आहे .

Pune Market: पुण्याच्या मार्केटमध्ये तब्बल अडीच किलोचा एक आंबा...

मार्केट हातात तब्बल अडीच किलो एकांबा असलेल्या आंब्याच्या झाले आहे आंबा अनेकांच्या आकर्षणाचे केंद्र बनला आहे

कर्नाटकातून दाखल झालेल्या या आंब्याच्या किलोला 60 ते 70 रुपये भाव मिळाला आहे

फळबाजारातील डी. बी. उरसळ अॅण्ड सन्स फर्मवर ही आवक झाली. कर्नाटकात या आंब्याला खुदादाद या नावाने ओळखले जाते.

या आंब्याची कोय, साल लहान असते तर, गर अधिक प्रमाणात असतो.

याची गोडी साधारण असते.बाजारात २० ते ३० किलोच्या पाच क्रेटस्मधून ही आवक झाली.यामध्ये आंब्याचे सरासरी वजन हे दोन ते अडीच किलो होते. लष्कर परिसरातील किरकोळ विक्रेत्यांनी या साठ्याची खरेदी केल्याची माहिती आडतदार यांनी दिली.

Income Tax: सोने-चांदीच्या दुकानावर आयकर विभागाची छापेमारी

पश्चिम विदर्भातील अमरावती,अकोला , यवतमाळ आणि परतवाडा मधील सोन्या चांदीच्या दुकानावर आयकर विभागांची छापेमारी..

पूनम ज्वेलर्स, प्रकाश ज्वेलर्स, ईशा ज्वेलर्स , अमरावती मधील एकता ज्वेलर्स वर आयकर विभागाची छापीमारे सुरू असल्याची माहिती..

सोन्या चांदीच्या दुकानावर आयकर विभागाचे सकाळपासून छापीमारीचे सत्र.

Kolhapur: करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात पुणे एटीएस पथक दाखल

भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर तसेच वस्त्र संहिता लागू केल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि कोल्हापूर एटीएस पथकाकडून मंदिराची पाहणी

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर, मंदिराचा परिसर तसेच सीसीटीव्ही रूममधून प्रत्येक गोष्टींची घेतली जात आहे माहिती

Washim: वाशिम शहरात आज दुसऱ्या दिवशीही अतिक्रमणावर तोडक कारवाई

वाशिम शहरातील पाटणी चौक परिसरात येत असलेल्या भागात अतिक्रमाचा हातोडा आज दुसऱ्या दिवशी सुरूच होता.

या परिसरात येत असलेल्या बालाजी संकुल,भाजी मार्केट या ठिकाणच् आज अतिक्रमण काढण्यात आलं.

सकाळपासूनच ही कारवाई सुरू केली होती. या ठिकाणच्या खुल्या जागेत पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे.

यात वाशिम नगरपालिकेचे कर्मचारी,पोलीस विभागाचे कर्मचारी आणि अतिक्रमण पथक या कारवाईत सहभागी झालं होते.

मंत्री चंद्रकांत पाटीलअजित पवार, शरद पवार आणि सुप्रिया सुळे एवढ्याचं राष्ट्रवादी पक्ष ब्रेकअप नंतर तरुणाकडून प्रेयसीला अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी

लग्नासाठी नकार दिल्यानंतर तरुणाकडून मैत्रिणीचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

धमकी देणाऱ्या तरुणा विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यातील गुन्हा दाखल

पुण्यातील IT तरुणीला बॉयफ्रेंड कडून धमकीचे मेसेज आणि कॉल

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण आणि फिर्यादी तरुणी हे दोघेही मूळचे कोल्हापूरचे असून गेल्या अनेक वर्षांपासून त्या दोघांचे प्रेम संबंध होते. मागील एक वर्षापासून काही कारणामुळे या दोघात वाद झाल्याने ते वेगळे झाले होते

त्यावेळी तरुणीने आरोपी तरुणासोबत केलं होतं ब्रेकअप

त्यानंतर पुन्हा गेल्या काही दिवसांपासून आरोपी तरुणाने माझ्याशी लग्न कर असा तगादा फिर्यादीने तरुणीच्या मागे लावला होता

वैतागलेल्या तरुणीने लग्नासाठी नकार दिल्यानंतर , रिलेशनशिप मध्ये असतानाच्या फोटो आणि व्हिडिओ फॉर वेबसाईटवर व्हायरल करण्याची तरुणाने धमकी दिली

यावरून आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे

अमरावतीचे सुपुत्र भूषण गवई सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश.

देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील नंतर अमरावतीला दुसरे महत्त्वाचे पद मिळाले आहे,

अमरावतीकर असलेले भूषण गवई यांनी आज दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रोपती मृर्मु यांच्या हस्ते सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली,

भूषण गवई यांनी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश पदाची शपथ घेतातच अमरावतीच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात अमरावतीकरांनी फटाक्याची आतषबाजी करत एकमेकांना लड्डू वाटप करत जल्लोष करण्यात आला,

भूषण गवई यांच्या निमित्ताने अमरावती जिल्ह्याच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेला आहे, यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले,

अमरावतीकर देशाच्या सर्वोच्च मोठ्या पदावर जातो याचा सार्थ अभिमान असल्याच्या प्रतिक्रिया अमरावतीकरांनी यावेळी दिल्या...

कारण मोठ्या प्रमाणावर आनंद उत्सव अमरावतीत साजरा करण्यात आला

Nandurbar: नंदुरबार जिल्ह्यात काल झालेल्या अवकाळी पावसामुळे फळ बागांना फटका

हतबल झालेल्या शेतकऱ्याने व्यक्त केला रोष.....

नंदुरबार जिल्ह्यातील शनिमांडळ गावात झालेल्या जोरदार पाऊस आणि गारपिटीमुळे 3 एकर टरबुज पिकाचे नुकसान.....

शेतकऱ्याने लावलेल्या तीन एकर टरबूज जमीनदोस्त..

पिकांचं मोठ नुकसान झाल्याने शेतकरी हातबल....

पिकासाठी लावलेला दीड ते 2 लाखांचा खर्च गेला वाया...

नुकसान झाल्याने 5 लाखांचे कर्ज फेडू कसा शेतकऱ्याने उपस्थित केला प्रश्न.....

धाराशिवचे माजी अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या गाडीला अपघात

हसन यांच्या खाजगी बोलेरो गाडी व कंटेनरचा झाला अपघात -

तुळजापुर रोडवरील पळसवाडी जवळ सोलापूर - धुळे महामार्गावर झाला अपघात

अपघातात गाडीचे मोठे नुकसान,सुदैवाने गौहर हसन व त्यांचे चालक अपघातातुन बचावले - कोणतीही गंभीर इजा नाही

जखमींवर धाराशिवच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू - गौहर हसन यांच्या हाताला मार लागल्याची माहिती

गौहर सहन हे धाराशिवच्या सध्याच्या अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांचे पती आहेत

कंटेनरने मागुन धडक दिल्याने अपघात झाल्याची माहिती - पोलिस घटनास्थळी दाखल झाले असुन पुढिल कारवाई सुरू

Pune Crime: पुण्यात उच्चभ्रू सोसायटीमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट

पुण्यातील बाणेर परिसरातील घटना

स्पा सेंटरच्या नावाखाली बापलेकाने सुरू केला सेक्स रॅकेटचा धंदा

बाणेर परिसरातील चार स्पा सेंटरला पुणे पोलिसांनी ठोकलं टाळ

स्पा सेंटरच्या नावाखाली सेवाक्स रॅकेट चालवणाऱ्या बाप लेकाला बाणेर पोलिसांकडून अटक

बाणेर येथे स्पा च्या नावाखाली चालणारे हाई प्रोफाइल सेक्स रॅकेट पोलिसांनी उघडकीस आणले आहे. वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त करणाऱ्या स्पा चालक, मॅनेजरसह जागा मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाणेर परिसरातील अनेक स्पा सेंटरची पुणे पोलिसांकडून झाडाझडती

बनावट ग्राहक पाठवून बाणेर पोलिसांनी स्पा सेंटरवर केली कारवाई

स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवणाऱ्या दोन आरोपींना पुणे पोलिसांनी केली अटक

सिराज चौधरी आणि वसीम चौधरी असा अटक केलेल्या आरोपींची नावे

दोन आरोपींना अटक करत जागा मालकांसह एका महिलेवर देखील बाणेर पोलिसांनी केला गुन्हा दाखल

पुण्यात छत्रपती संभाजी राजे यांना दुग्धाभिषेक घालून जयंती साजरी

स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आज पुण्यातील डेक्कन चौकात साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती संभाजी महाराजांना दुग्धाभिषेक करण्यात आला त्याचबरोबर अनेक शंभू भक्तांनी रक्तदानही यावेळी केलं. गेली अनेक वर्ष हा उपक्रम जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी घेतला जातो. आणि वर्षभर छत्रपती संभाजी महाराजांची आरती ही रोज केली जाते. अशी माहिती भूषण वर्पे यांनी दिली.

शिरूर परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ, शिरूर पोलिसांचं नागरिकांकडे दुर्लक्ष

शिरूर शहरांमधील अतिशय गजबजलेल्या रामलिंग रोड असणाऱ्या प्रमोद प्रेम पार्क या सोसायटीमध्ये मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास तोंडाला मास्क लावून आठ ते नऊ चोरांनी पार्किंग मध्ये पार्क केलेल्या गाड्यांमधून पेट्रोल काढून चोरी करण्याचा प्रयत्न केला. बाहेरून येणाऱ्या गाड्यांचा आवाज येताच चोरांनी त्या ठिकाणावरून पळ काढला व त्यांनी चोरीसाठी वापरलेले टू व्हीलर गाडी व पायातील चप्पल त्याच ठिकाणी सोडून पळून गेले. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले असून नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

जालन्यात दुचाकीस्वाराला एसटी बसची धडक, घटनेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

जालन्यात दुचाकीस्वाराला एसटी बस धडकल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झालाय.

जालना - मंठा महामार्गावर ही घटना घडलीय. सिंधी काळेगाव येथील सुदाम शेषराव कोरधने हे जालना - मंठा महामार्गावरील अंबिका ढाबा परिसरातून जात होते.

यावेळी त्यांच्या पाठीमागून आलेल्या भरधाव बसने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले.

त्यामुळे त्यांना जालन्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलय.

दरम्यान, या प्रकरणी सुदाम कोरधने यांच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून सदरील बस चालकाविरुद्ध तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुका जालना पोलिसांनी सदरील बस ताब्यात घेतली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील ब्रह्मदेवाच्या मूर्तीला तडा

तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील उपदेवता असलेल्या ब्रह्मदेवाच्या मूर्तीला तडा गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

मंदिर विकास आराखड्यासाठी मूर्तीचे स्थलांतर करत असताना हा प्रकार घडण्याचा आरोप पुजारी मंडळाकडून करण्यात आला.

या प्रकरणात जबाबदार व्यक्तींवर कारवाई करावी अशी मागणी मंडळाकडून मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

मंदिर देवस्थानचे तहसीलदार यांना त्याबाबतच निवेदन देण्यात आलं. मंदिरातील उपदेवतांच्या मूर्तीच चुकीच्या पद्धतीने स्थलांतर करण्यात आलं.

त्यामुळेच उपदेवता असलेल्या ब्रह्मदेवाच्या मूर्तीला तडा गेल्याचा आरोप करण्यात आलाय.यामध्ये मंदिराचे विश्वस्त, महंत तसेच पुरातत्त्व विभाग दोषी असल्याचा आरोप करत दोशींवर कारवाई करावी अशी मागणी पुजारी मंडळाने केली आहे.

राज शिष्टाचाराचा भंग मुख्यमंत्र्यांची भेट घेणाऱ्या त्या दोन लाचखोर अधिकाऱ्यांचे निलंबन

राजशिष्टाचाराचे उल्लंघन केल्याप्रकरणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोघा महसुल अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मुख्यमंत्री दौऱ्याच्या वेळी संबंधित दोघेही परवानगी न घेता त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले होते.

त्यांना मुख्यालयात राहण्याचे आदेश असताना सुद्धा त्यांनी त्या आदेशाचे उल्लंघन केले आणि राज शिष्टाचार पाळला नाही, असा ठपका ठेवून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्याकडून करण्यात आली आहे. यात सहाय्यक महसुल अधिकारी एस. पी. हांगे व ग्राम महसुल अधिकारी व्ही. व्ही. कंठाळे या दोघांचा समावेश आहे. काही महिन्यांपूर्वी लाच घेताना हे दोघेही अधीकारी lcb च्या जाळ्यात सापडले होते. सध्या त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. अशा लाचखोर अधीका-यांनी मुख्यमंत्र्याचा सत्कार केला होता. यावरून माजी आमदार वैभव नाईक यांनी नाराजी व्यक्त करत हा प्रकार उघड केला होता. तर या मागचा आका कोण असा सवाल उपस्थित केला होता.

कृष्णा नदी संवर्धनासाठी चार राज्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि अभ्यासकांची जलयात्रा

कृष्णा नदीच्या संवर्धनासाठी चार राज्यातील सामाजिक कार्यकर्ते ,जलतज्ञ आणि अभ्यासक एकत्रित आले आहेत.

कृष्णा नदीच्या प्रदूषण मुक्तीसाठी कृष्णा कुटुंब या उपक्रमांतर्गत कृष्णा जलयात्रा सुरू करण्यात आली आहे.

कर्नाटक राज्यातल्या कुडल संगम पासून महाबळेश्वर पर्यंत निघालेल्या जलयात्रेचे सांगलीमध्ये विविध सामाजिक स्वागत करण्यात आले.

कृष्णा नदीच्या काठावर कृष्णा नदी संवर्धनासाठी जनजागृती करण्याबरोबर सरकारवर दबाव आणण्यासाठी प्रयत्न करण्याची निर्धार करण्यात आलाय.

15 मे रोजी कृष्णा नदीचा उगम होणाऱ्या महाबळेश्वर येथे जलतज्ञ राजेंद्र सिंह राणा यांच्यासह प्रमुख जलतज्ञ व अभ्यासकांच्या उपस्थितीत जलयात्रेचा समारोप होणार आहे.

Dharashiv: धाराशिव जिल्ह्याला सलग दुसऱ्या दिवशी ही अवकाळीचा तडाखा

धाराशिव जिल्ह्याला सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने चांगला तडाखा दिला आहे.

धाराशिव, उमरगा,भूम, तुळजापूर भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला.

जवळपास तासभर झालेल्या या पावसाने शिवारात पाणीच पाणी केलं. वादळी वाऱ्यामुळे अनेक भागात विद्युत पुरवठा देखील खंडित झाला होता.

धाराशिव शहरात रात्री उशिरा देखील पावसाच्या सरी बरसल्या.उमरगा तालुक्यात एका घोड्यासह चार जनावरे वीज पडून दगावली आहेत.हवामान विभागाने धाराशिव जिल्ह्यात येलो अलर्ट जारी केला आहे.

शासकीय रुग्णालयात रुग्णसेवेत कामात हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरांसह 11 कर्मचाऱ्यांवर अधिष्ठातांची कारवाई

- सोलापूर शासकीय रुग्णालयाच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टर्स आणि इतर कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा

- शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.संजीव ठाकूर ॲक्शन मोडवर

- रुग्णालयातील ओपीडी , आयपीडीला अचानकपणे भेट देत कामात निष्काळजीपणा करणाऱ्या डॉक्टरांसह इतर कर्मचाऱ्यांची केली एक दिवसाची वेतन कपात

- शासकीय रुग्णालयामध्ये येणाऱ्या गोरगरीब रुग्णांना बाहेरची औषधे लिहून दिल्यास तात्काळ संबंधित डॉक्टर कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा

- वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांची रात्री अपरात्री थेट वार्डात घुसून विविध समस्यांबाबत रुग्णांशी संवाद

- रुग्णांना चांगल्या सुविधा मिळण्यासाठी बनवला ॲक्शन प्लॅन

- येणाऱ्या काळात सातत्याने कारवाई सुरूच ठेवण्याचा अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांचा इशारा

अकोला शहरातल्या चार ते पाच ज्वेलर्स दुकानांवर आयकर विभागाची कारवाई

अकोला शहरातल्या चार ते पाच ज्वेलर्स दुकानांवर आयकर विभागाने कारवाई केली आहे..

आज सकाळी शहरातल्या पूनम ज्वेलर्स, अग्रवाल ज्वेलर्स, ईशा ज्वेलर्स आणि इतर काही ज्वेलर्स दुकानांवर आयकर विभागाने आकस्मित भेटी दिल्या..

नागपूर आणि औरंगाबाद येथील आहे आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून या ज्वेलर्स दुकानांवर कारवाई सुरू आहे .....

झडतीदरम्यान रेकॉर्डही तपासले जात आहे, आयकरच्या या छापेमारीमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे.

आयकर छाप्याला राजकीय किनार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे..

दरम्यान, आज सकाळपासून या ज्वेलर्स दुकानांवर आयकर विभागाचे अधिकारी तळ ठोकून आहेत..

आयकर विभागाच्या या छापेमारी कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे...

गृहराज्य मंत्र्यांनी नाचवली कोटेश्वर देवीची पालखी

खेड तालुक्यातील जामगे येथील श्री क्षेत्र कोटेश्वरी मनाई मंदिर येथे देवीचा वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. या उत्सवात देवीच्या पालखीची शेकडो भाविकांच्या उपस्थितीत पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक पार पडली. राज्यमंत्री योगेश कदम यांनीही भक्तिभावाने पालखी नाचवत देवीचं दर्शन घेतलं. या धार्मिक आयोजनाने परिसरात भक्ती, संस्कृती आणि एकतेचं दर्शन घडवलं.

धाराशिवच्या कळंब शहरात मध्यरात्री दीड वाजता घरफोडी, चोरट्यांनी ८५ वर्षीय व्यक्तीवर केला प्राणघातक हल्ला

चोरट्यांनी फायटरने वार करुन केले जखमी, जखमी व्यक्तीला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात केले दाखल

चोरट्यांचा हल्ल्यात ८५ वर्षीय वृध्द सदाशिव पारखे यांचा एक डोळा निकामी तर दोन्ही हातांवर,कपाळावर व कानावर खोल जखमा

कळंब शहरातील पुनर्वसन सावरगाव भागातील प्रदीप पारखे यांच्या घरी चोरट्यांचा हैदोस

कळंब तालुक्यात चोरीच्या घटना वाढल्या, चोरट्यांचा बंदोबस्त करण्याचे पोलिसांसमोर आव्हान

माळशिरस सह सहा तालुक्यात 32 टॅंकरने पाणी पुरवठा

माढा, माळशिरस, करमाळा, सांगोलासह सहा तालुक्यातील 26 गावांना 32 टॅंकरने पाणी पुरवठा सुरू आहे. माळशिरस तालुक्यातील सर्वाधिक आठ ते दहा गावांना टॅंकरने पाणी पुरवठा केला जात आहे तर सांगोला तालुक्यातील काही गावे आणि वाड्यावस्त्यांना पाणी पुरवले जात आहे.

Nandurbar: नंदुरबार जिल्ह्यात गेल्या 8 दिवसात अवकाळीच थैमान

नंदुरबार जिल्ह्यात गेल्या 8 दिवसापासून अवकाळी पावसाने थैमान घातला आहे.त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

नंदुरबार तालुक्यातील आष्टा येथील शेतकरी सुकलाल आधार खंदारे यांनी त्यांच्या तीन एकर शेतात जानेवारी कांद्याची लागवड केली होती.

लागवड, मजुरी, फवारणी या मशागतीतून त्यांना दीड लाखाचा खर्च आला. त्यांनी कांदा काढण्यासाठी सुरुवात केल्यानंतर अवकाळी पावसाला सुरुवात झाली.

सहा दिवसापासून पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. मागील वर्षीही कापसाचे नुकसान झाले होते.

मात्र पिक विमा काढून ही त्यांना त्याची भरपाई मिळाली नाही. कांद्याचा पिक विमा काढत नसल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे....

Dharashiv: धाराशिव येथील एसटी बसस्थानकात मॉकड्रील

धाराशिव येथील बसस्थानकावर जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष किर्ती किरण पुजार यांच्या मार्गदर्शनाखाली मॉकड्रिलचे आयोजन करण्यात आले होते.बस डेपोमध्ये अचानक पेट घेतल्याची आपत्कालीन परिस्थिती उभी करून त्या अनुषंगाने विविध यंत्रणांची तयारी तपासण्यात आली.याला सर्वच यंञणांनी जलद प्रतिसाद दिला या मॉकड्रिल प्रसंगी प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शोभा जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

नवीन मूग बाजारात दाखल, ७५११ रुपयांपर्यंत मिळाले दर

वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळी हंगामातील नवीन मुगाची आवक व्हायला सुरुवात झाली आहे, मुगाला ६ हजार ८७० ते ७ हजार ५११ रुपयांपर्यंत दर मिळालेत. बाजार समितीमध्ये दिड हजार क्विंटल मुगाची आवक झाल्याचं बघायला मिळालं. जिल्ह्यात सध्या ढगाळ वातावरण असल्यामुळे शेतकरी मूग काढणीची घाई करत असून चांगले दर मिळत असल्यानं लगेच विक्रीसाठी आणत आहे. जिल्ह्यात यंदा उन्हाळी हंगामात १ हजार ६१२ हेक्टर क्षेत्रावर मुगाची पेरणी झाली होती.

भारतीय जनता पार्टीच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी दत्ता कुलकर्णींची दुसऱ्यांदा वर्णी

भारतीय जनता पक्षाच्या धाराशिव जिल्हा अध्यक्षपदी पुन्हा दत्ता कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. कुलकर्णी यांनी 2016 ते 19 च्या दरम्यान तब्बल चार वर्ष जिल्हाध्यक्ष पद भूषवलं होतं.त्यादरम्यानच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या होत्या.आता पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर दत्ता कुलकर्णी यांच्या खांद्यावर अध्यक्ष पदाची जबाबदारी पक्षाने सोपवली आहे.

राज्यात १०८ रुग्णवाहिकांची संख्या वाढणार; नोव्हेंबरपर्यंत १,७५६ नव्या गाड्या सेवेत

राज्यातील आपत्कालीन वैद्यकीय सेवा १०८ अधिक बळकट होणार आहे

नोव्हेंबरपर्यंत १,७५६ नव्या रुग्णवाहिका सेवेत दाखल होणार आहेत. या आधुनिक रुग्णवाहिकांमध्ये बेसिक व अॅडव्हान्स्ड लाइफ सपोर्ट, निओनॅटल केअर युनिट, दुचाकी व बोट रुग्णवाहिका यांचा समावेश आहे.

आरोग्य विभागाने सुमीत एसएसजी व बीव्हीजी महाराष्ट्र ईएमएस यांच्याशी १० वर्षांचा करार केला आहे.

सुमारे १,६०० कोटींची गुंतवणूक असलेल्या या उपक्रमाची अंमलबजावणी पाच टप्प्यांत होणार असून,

पुणे जिल्ह्यात ८३ टँकर सुरू; पाणीटंचाईवर खासगी टँकरांचा आधार

उन्हाची तीव्रता वाढल्याने आंबेगाव, जुन्नर, पुरंदर आदी सात तालुक्यांतील ८३ गावे व ४५७ वाड्या-वस्त्यांमध्ये ८३ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. यापैकी केवळ ६ टँकर सरकारी असून, ७७ खासगी टँकर वापरण्यात येत आहेत.

एक लाख ४२ हजार नागरिक व ५१ हजार जनावरांना या टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या २८७ खेपा प्रस्तावित असून त्यापैकी २५३ खेपा पूर्ण झाल्या आहेत

रेल्वेच्या पुणे विभागात स्थानकावर प्रवाशांना WIFI सुविधा

मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने आता तब्बल ७९ रेल्वे स्थानकांवर मोफत वाय- फाय सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

पुणे विभागातील महत्त्वाच्या स्थानकांवर प्रवाशांना ही सुविधा रेल्वे प्रशासनाकडून पुरवण्यात येत आहे. यामुळे त्यांच्या प्रवासाचा अनुभव अधिक सुखकर आणि सोयीस्कर होत आहे.

विभागातील सर्व स्थानकांवर अशी सुविधा असावी, आणि त्याबाबतची जनजागृतीचे फलक रेल्वे प्रशासनाने स्थानकांवर लावावेत, अशीही मागणी प्रवाशांकडून केली जात आहे

राज्यात १२ हजार बॅलेसेमिया रुग्ण वाढल्याने मोफत सल्ला, नोंदणी आणि उपचारांची मोहीम सुरु करण्यात आलीय

राज्यात सुमारे १२ हजार बॅलेसेमिया रुग्णांची नोंद झाली आहे रुग्णसंख्या वाढू नये म्हणून 'बॅलेसेमिया मुक्ती' अभियान राबवले जात आहे.

पुणे जिल्ह्यात ही १२०० रुग्ण असून, जिल्हा रुग्णालयात ६० जणांवर उपचार सुरू आहेत.

आरोग्य विभागातर्फे रुग्णांना मोफत रक्त, बोन मॅरो ट्रान्सप्लांटसारखे उपचार तसेच ‘१०४’ क्रमांकावर मोफत सल्ला दिला जाणार आहे

पुणेकरांचा पीएमपी बसमधून प्रवास होणार आणखीन सुलभ

पीएमपीच्या ताफ्यात येणार एक हजार बस

पीएमपीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर…

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या माध्यमातून ५००, तर पीएमआरडीएकडून ५०० बसची खरेदी केली जाणार आहे.

या बस १२ मीटर लांबीच्या असून, सीएनजीवरील आहेत. एका बससाठी ४८ लाख रुपये मोजावे लागणार आहेत.

हवामान बदलामुळे मुलांमध्ये विषाणूसंसर्ग, ताप, उलट्या, जुलाबाची लक्षणे; काळजी घेण्याचा आरोग्यतज्ज्ञांचा इशारा

उन्हाळ्यात अचानक सुरू झालेल्या अवकाळी पावसाने हवामानात मोठा बदल झाला आहे. यामुळे लहान मुलांमध्ये विषाणुसंसर्गाचे प्रमाण वाढले आहे.

गेल्या काही दिवसांत ताप, उलट्या आणि जुलाबाची तक्रार असलेल्या लहान मुलांमध्ये वाढ झाली. या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचा इशारा आरोग्यतज्ज्ञांनी दिला आहे.

यंदा उन्हाळ्यात तापमानात मोठी वाढ झाली होती. त्यानंतर तापमानात अचानक घट होऊन ढगाळ हवामान झाले.

आता अवकाळी पाऊस सुरू असून, हवामान बिघडले आहे. अशा प्रकारचे हवामान हे विषाणूंच्या वाढीस पोषक ठरते.

त्यामुळे विषाणुसंसर्गाच्या रुग्णांचे प्रमाण गेल्या काही दिवसांत वाढले आहे.

लहान मुलांची प्रतिकारशक्ती कमकुवत असल्याने त्यांच्यात या संसर्गाचे प्रमाण अधिक आहे. लहान मुलांमध्ये ताप, उलट्या आणि जुलाब ही लक्षणे प्रामुख्याने दिसून येत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.