- rat१४p५.jpg-
२५N६३६५८
आकांक्षा कदम
कॅरम स्पर्धेत आकांक्षा कदम विजयी
रत्नागिरी, ता. १४ ः ५९वी महाराष्ट्र राज्य आणि आंतरजिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत महिला गटात रत्नागिरीच्या आकांक्षा कदमने विजेतेपद पटकावले. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने ठाणे जिल्हा कॅरम असोसिएशन व नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित ५९वी आंतरजिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धा १० ते १३ मे या कालावधीत नवी मुंबईत झाली. या स्पर्धेत महिला एकेरीत अंतिम फेरीमध्ये रत्नागिरीच्या आकांक्षाने मुंबईच्या मिताली पाठकवर १७-१४, २५-०२, २५-०१ असा तीन सेटपर्यंत रंगलेल्या सामन्यात मात केली. तिने महिलागटाचे विजेतेपद पटकावले. या यशाबद्दल पालकमंत्री उदय सामंत, आमदार शेखर निकम, आमदार किरण सामंत, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे सल्लागार सुचय रेडीज, अध्यक्ष प्रदीप भाटकर, उपाध्यक्ष सुरेंद्र देसाई, सचिव मिलिंद साप्ते व खजिनदार नितीन लिमये आणि सर्व जिल्हावासियांनी अभिनंदन केले आहे.