आयपीएलमध्ये या खेळाडूची एन्ट्री, 6 कोटी रुपये देत दिल्ली कॅपिटल्सचा धक्कादायक निर्णय
GH News May 15, 2025 12:08 AM

आयपीएल 2025 स्पर्धा स्थगितीनंतर 17 मे पासून पुन्हा सुरु होणार आहे. 17 मे ते 3 जून दरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे. असं असताना काही विदेशी खेळाडू मायदेशी परतले आहेत. त्यापैकी काही खेळाडूंनी स्पर्धा खेळण्यास नकार दिला आहे. त्याची कारणं वेगवेगळी आहेत. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात वनडे आणि टी20 मालिका होणार आहे. तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्सशिपचा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात होणार आहे. त्यामुळे या चार संघात ज्या खेळाडूंची निवड झाली आहे त्यांचं परतणं कठीण आहे. असं असताना उर्वरित आयपीएल स्पर्धेसाठी संघांमध्ये बदल होणं निश्चित आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाने बांगलादेशच्या मुस्तिफिझुर रहमानला साइन केलं आहे. त्याला लिलावात कोणीही भाव दिला नव्हता. मुस्तफिझुर रहमान बांगलादेशचा वेगवान गोलंदाज आहे. त्याच्यासाठी दिल्ली कॅपिटल्सने 6 कोटी रुपये मोजले आहेत.

मुस्तफिझुर रहमानची संघात एन्ट्री कशी?

मुस्तिफिझुर रहमानची दिल्ली कॅपिटल्स संघात एन्ट्री झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. दिल्ली कॅपिटल्सचा ओपनर जॅक फ्रेझर मॅगर्कने भारतात परतण्यास नकार दिला आहे. भारत पाकिस्तान युद्धजन्य स्थितीत ऑस्ट्रेलियाला परतला आहे. त्यामुळे त्याची जागा भरून काढणं भाग होतं. त्याच्या जागी मुस्तिफिझुर रहमानला दिल्ली कॅपिटल्स संघात जागा मिळाली आहे. यामुळे नव्या वादाला फोडणी मिळण्याची शक्यता आहे. कारण तो बांगलादेशी खेळाडू आहे. मागच्या काही महिन्यात बांग्लादेश आणि भारतातील संबंध ताणले गेले आहेत. शेख हसीना सरकार पडल्यानंतर मोहम्मद यूनिस खानच्या हाती बांगलादेशची सूत्र आहेत. असं असताना मोहम्मद यूनिस खान भारताविरुद्ध गरळ ओकत आहे. त्यामुळे मुस्तिफिझुर रहमानचं आयपीएल खेळणं वादाचा विषय ठरू शकतो.

दरम्यान, जॅक फ्रेजर मॅगर्कने खेळण्यास नकार दिल्याने दिल्ली कॅपिटल्सच्या पथ्यावर पडलं आहे. कारण त्याने त्याचा फॉर्म काही चांगला नव्हता. त्याने सहा सामन्यात 9.17 च्या सरासरीने फक्त 55 धावा केल्या होत्या. दुसरीकडे, मुस्तिफिझुर रहमानकडे आयपीएलचा अनुभव आहे. त्याने 57 सामन्यात 61 विकेट घेतल्या आहेत. त्यात मिचेल स्टार्कचं भारतात परतणं कठीण आहे. अशा स्थितीत रहमान स्टार्कची जागा भरून काढेल असं दिसत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.