हा व्हिडीओ पाहा....अजित पवार आणि शरद पवार यांच्यात स्टेजवरच गुप्तगू सुरुय....विधानसभा निवडणुकीनंतर पवार काका पुतण्यामधील भेटीगाठी वाढल्या आहेत...त्यामुळे सहकाराच्या आडून पुन्हा काका-पुतण्यामधील दुरावलेले संबंध पुर्ववत होण्याची शक्यता वर्तवली जातेय....तर अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील वाढत्या भेटीगाठीवरुन संजय राऊतांनी खोचक टोला लगावलाय...
एकीकडे महायुतीत अंतर्गत धुसफूस सुरु आहे.. दुसरीकडे महाविकास आघाडीतही सगळं काही आलबेल नसल्याचं चित्र आहे. त्यापार्श्वभुमीवर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पुन्हा नवे समीकरण जुळणार का? आणि काका पुतण्या एकत्र येणार का? याकडे लक्ष लागलंय...