Unseasonal rain wreak havoc in Latur; Death of cows, chickens, damage to mango orchards
Marathi May 15, 2025 12:26 PM


गेल्या काही दिवसांपासू राज्यातील विविध भागामंध्ये विशेषतः मराठवाड्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. सलग चार दिवस लातूर जिल्ह्यातील निलंगा औसा आणि उदगीर तालुक्यात अवकाळी पावसाचा जोर कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता या जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसासोबतच जोरदार वादळ आणि विजांच्या कडकडाटांमुळे शेतकऱ्यांच्या फळबागा आणि शेतीमालाचंही नुकसान झाले आहे.

लातूर : गेल्या काही दिवसांपासू राज्यातील विविध भागामंध्ये विशेषतः मराठवाड्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. सलग चार दिवस लातूर जिल्ह्यातील निलंगा औसा आणि उदगीर तालुक्यात अवकाळी पावसाचा जोर कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता या जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसासोबतच जोरदार वादळ आणि विजांच्या कडकडाटांमुळे शेतकऱ्यांच्या फळबागा आणि शेतीमालाचंही नुकसान झाले आहे. सततच्या अवकाळीमुळे होणारे नुकसान यामुळे जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत सापडला आहे. तर मौजे हंगरगा येथे पोल्ट्री फार्मचे पत्रेच उडून गेल्याने तब्बल 600 कोंबड्या दगावल्याची माहिती समोर आली आहे. (Unseasonal rain wreak havoc in Latur; Death of cows, chickens, damage to mango orchards)

लातूर शहर, निलंगा, औसा आणि उदगीर तालुक्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने मराठवाड्यात अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. पण याचा सर्वाधिक फटरा लातूर जिल्ह्याला बसला आहे. कारण गेल्या चार दिवसांपासून या जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. सातत्याने होणाऱ्या पावसाळे शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. पावसापूर्वी जोरदार वारे वाहत असून विजेचा गडगडाट सुरूच आहे. त्यातच, काही ठिकाणी वीज पडून मनुष्यहानी आणि पशू हानी झाल्याच्याही घटना घडल्या आहेत. तसेच, शेतकऱ्यांच्या फळबागा आणि शेतीमालाचेही नुकसान झाल्याने बळीराजा चिंतेत आहे.

हेही वाचा… Revenue Minister : पावसाळी अधिवेशनात एकही तक्रार नको, महसूल मंत्री बावनकुळेंची अधिकाऱ्यांना तंबी

जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील मौजे हंगरगा येथे बुधवारी (ता. 14 मे) दुपारी पाऊस, वारा, वादळामुळे भागवत केंद्रे यांच्या पोल्ट्री फार्मचे मोठे नुकसान झाले आहे. पोल्ट्री फार्मचे पत्रे उडून गेले आहेत. या पोल्ट्री फार्ममधील 600 कोंबड्या मृर्त अवस्थेत आढळून आल्या आहेत. या ठिकाणी असलेल्या गोडाऊनमध्ये शेतमाल होता, त्याशिवाय त्या ठिकाणी असलेल्या मका आणि कोंबड्याचे खाद्य यांचेही नुकसान झाले असून ते पूर्णतः भिजले आहे. तर, मौजे खेर्डा खू. येथे संग्राम बापूराव राजवाड यांच्या दोन म्हशी झाडाखाली बांधलेल्या असताना झाडावर वीज पडल्यामुळे एका म्हशीचा मृत्यू झाला असून दुसरी म्हैस जखमी झाली आहे.

उदगीर तालुक्याच्या कल्लूर येथील बाबाराव धोंडीबा शेंडगे यांच्या म्हशीवर ती शेतात असताना वीज पडल्याने ती दगावली आहे. मौजे बामणी येथे बालाजी वामन घोगरे यांची एक गाय आंब्याच्या झाडाखाली बांधलेल्या असताना झाडावर वीज पडल्यामुळे गायीचा मृत्यू झाला आहे. कडब्याच्या गंजी या पावसात भिजल्याने शेतकऱ्यांना समोर जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. लातूर जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून अवकाळी पावासामुळे मोठे नुकसान झाले शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.



Source link

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.