फैय्याज शेख
शहापूर : गावातील वाद, ग्रामस्थांच्या समस्या, प्रश्न सोडविण्यासाठी सरपंच व उपसरपंच मिळून मार्ग काढत असतात. परंतु गावातील उपसरपंचाकडूनच लाच मागण्याचा प्रकार शहापूरच्या खर्डी येथे समोर आला आहे. गावातील एका व्यक्तीच्या घराची घरपट्टी नावावर करण्यासाठी ३० हजार रुपयांची मागणी करण्यात आली. हि रक्कम स्वीकारताना उपसरपंचाला रंगेहाथ पकडण्यात आले.
च्या खर्डीचे मोसीन मृर्तुजा शेख असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतलेल्या उपसरपंचाचे नाव आहे. शहापूर तालुक्यातील महत्त्वाची व लोकसंख्येने मोठी असलेली खर्डी ग्रामपंचायत समजली जाते. याच गावातील उपसरपंचाला लाच घेताना पकडण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान गावातील तक्रारदार असलेल्या व्यक्तीचे घर आहे. मात्र त्याच्या नावावर घरपट्टी येत नव्हती.
घरपट्टी नावावर करण्यासाठी पैशांची मागणी
त्या अनुषन्गाने घरपट्टी नावावर करण्यासाठी तक्रारदाराने मध्ये रितसर अर्ज केला होता. मात्र ही घरपट्टी नावावर करून देण्यासाठी खर्डीचे उपसरपंच मोसीन शेख याने ३० हजार रुपयांची मागणी केली होती. जो पर्यंत पैसे देत नाही, तो पर्यंत घरपट्टी नावावर करून देणार नाही; असे म्हणून तक्रारदारास सांगत होता. उपसरपंचाकडून होत असलेल्या पैशांच्या मागणीला सदर व्यक्ती त्रासला होता.
३० हजार स्वीकारताना रंगेहाथ पकडले
सदर व्यक्तीने या प्रकरणी ठाणे कडे तक्रार केली. त्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी तक्रारीची शहानिशा करत पडताळणी केली. यानंतर सापळा रचून खर्डीचे उपसरपंच मोसीन शेख यांना ३० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले असून रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.