वाडा (बातमीदार) : डोंगस्ते ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रशांत मेणे यांच्या मनमानी कारभाराविरोधात ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. ग्रामपंचायत कार्यालयात बुधवार (ता. १४) मतदान होऊन शून्य विरुद्ध नऊ मतांनी ठराव मंजूर झाला आहे. त्यामुळे लवकरच नवीन उपसरपंचाची निवड केली जाणार आहे. डोंगस्ते ग्रामपंचायतीच्या उपसरपंचावरील ठराव सदस्य शुभांगी सुभाष पष्टे यांनी मांडला, तर अनुमोदन मच्छिंद्र अंकुश पष्टे यांनी दिले. या वेळी उपसरपंच सोडून अन्य सर्व सदस्य उपस्थित होते. ठराव अविश्वासाठी पटलावर ठेवताच बहुमतांनी मंजूर करण्यात आला. वाडा दंडाधिकारी तथा तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यानी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले. निर्धारित मुदतीत सरपंचासह सर्व सदस्यांच्या उपस्थितीत नवीन उपसरपंचाची निवड करणार येणार आहे.