सध्या देशभरात 10वी आणि 12वीच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. CBSE आणि राज्य मंडळांचे निकाल हळूहळू समोर येत आहेत. याच दरम्यान सोशल मीडियावर वैभव सूर्यवंशीच्या निकालाचीही बातमी आहे, ज्यामध्ये तो बोर्ड परीक्षेत नापास झाल्याचं सांगितलं जात आहे. समोर आलेल्या बातमीनुसार, वैभव सूर्यवंशीने CBSE बोर्डाची 10वीची परीक्षा दिली आणि तो नापास झाला. पण तो खरच नापास झाला की सगळ्या अफवा आहेत? चला जाणून घेऊया…
वैभव सूर्यवंशी बोर्ड परीक्षेत नापास झाले?
सोशल मीडियाच्या हवाल्याने वैभव सूर्यवंशीच्या नापास होण्याच्या बातमीची जेव्हा आम्ही पडताळणी केली, तेव्हा आम्हाला आढळलं की असं काहीच नाही. म्हणजे, वैभव सूर्यवंशी बोर्ड परीक्षेत नापास झालेला नाही. मग तो परीक्षा पास झाला का? नाही, तसंही नाही. कारण, पास आणि नापासचा प्रश्न तेव्हा येईल जेव्हा तो परीक्षेला बसेल आणि ती देईल. आता प्रश्न आहे की मग जी बातमी समोर आली ती होती तरी काय? कारण, आग नसेल तर धूर कुठून येईल? Video: सापासमोर ‘नागिन धून’ वाजवली तर… एका मुलाने केलेला प्रयोग कॅमेऱ्यामध्ये कैद, व्हाल चकीत
ही बातमी फेक आहे
सोशल मीडियावर वैभव सूर्यवंशीच्या 10वीच्या बोर्ड परीक्षेत नापास होण्याबाबत जी बातमी आली, ती खरंतर एक अफवा आहे. त्यात काहीच तथ्य असं नाही. त्यात लिहिलं आहे की 14 वर्षीय वैभव सूर्यवंशी 10वीच्या CBSE बोर्ड परीक्षेत नापास झाल्यानंतर BCCI ने त्याच्या उत्तरपत्रिकेची DRS पद्धतीने पुनरावलोकन करण्याची विनंती केली आहे.
10वीचा विद्यार्थीही नाही वैभव, IPL 2025 मध्ये 35 चेंडूंमध्ये शतक ठोकलं
आता सत्य काय आहे? तर पहिली गोष्ट, वैभव सूर्यवंशी सध्या 10वीचा विद्यार्थी नाही. तो फक्त 9वी इयत्तेत शिकतो आहे. म्हणजे त्याच्या बोर्ड परीक्षेला अजून वेळ आहे. 14 वर्षीय सूर्यवंशीने IPL 2025 मध्ये 35 चेंडूंमध्ये शतक ठोकून चर्चेत आला होता. त्याने त्या डावात 11 षटकार मारले होते. वैभव सूर्यवंशी हे नाव बोर्ड परीक्षेत नापास होणाऱ्याचं नाही, तर T20 क्रिकेटच्या जगतात शतक ठोकणारा सर्वात तरुण फलंदाजाचं आहे.