सध्या जागतिक मीडिया पाकिस्तानात जे दहशतवादाच नेटवर्क आहे, त्या बद्दल मौन बाळगून आहे. उलट पाकिस्तानला अनुकूल ठरेल असा प्रचार जागतिक मीडियाकडून सुरु आहे. लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटना पाकिस्तानी लष्कराच्या उपसंघटना आहेत. 7 मे रोजीच्या एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तानात मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांचे दफनविधी झाले. त्यावेळी पाकिस्तानी लष्कराचे वरिष्ठ अधिकारी तिथे उपस्थित होते. हे फोटोच पाकिस्तानातील सध्याची व्यवस्था कशी आहे, ते सांगण्यासाठी पुरेसे आहेत. नुकतीच लष्कर-ए-तैयबा आणि अहले सुन्नत वल जमात या जागतिक दहशतवादी संघटनांनी कट्टरपंथीय मौलानांच्या संघटनांसोबत हातमिळवणी केली. त्यांची कराचीमध्ये एक मोठी सभा झाली.
दीफा इ वतन कौन्सिलने ही रॅली आयोजित केली होती. दीफा इ वतन कौन्सिल ही पाकिस्तानातील धार्मिक कट्टरपंथीय आणि राजकीय गटांची संघटना आहे. जमियत उलेमा इ इस्लाम फझलचे प्रमुख मौलाना फझलुर रेहमान यांच्या नेतृत्वाखाली कट्टरपंथीयांची सभा झाली. भारताविरोधातील पाकिस्तानी लष्कराच्या बनियान-उन-मारसूस ऑपरेशनच्या सेलिब्रेशनसाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत अनेक दहशतवादी आणि कट्टरपंथीयांनी भारताविरुद्ध प्रक्षोभक भाषणं केली. पण यावेळच्या रॅलीच वैशिष्टय म्हणजे बुलेटप्रूफ काचेच्या मागे उभं राहून या दहशतवाद्यांनी भाषणं केली.
संघर्षाला त्यांनी धर्माशी जोडलं
बुलेट प्रूफ काचेमागे भाषण म्हणजे भारतीय सैन्य दलांची भिती लष्कर ए तैयबावर स्पष्टपणे दिसून येतेय. अनेक कट्टरपंथीय मौलाना या रॅलीत सहभागी झालेले. त्यांनी भारताविरोधात प्रक्षोभक, चिथावणीखोर वक्तव्य केली. भारत-पाकिस्तानमधील संघर्षाला त्यांनी धर्माशी जोडलं. खरंतर तीन दिवसाच्या लढाईत पाकिस्तानचा दारुण पराभव झालय. भारतीय सैन्य दलाच्या पराक्रमासमोर पाकिस्तान हतबल झाला. म्हणून सीजफायरसाठी अमेरिकेची मदत घेतली. पण पाकिस्तानी नेते, सैन्य तिथे खोटी माहिती देऊन विजयाच्या फुशारक्या मारत आहेत.
….तर बात दूर तक जायेंगी
भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज जम्मू-काश्मीर दौऱ्यावर होते. ऑपरेशन सिंदूरसाठी त्यांनी भारतीय जवानांच भरभरुन कौतुक केलं. त्याचवेळी त्यांनी पाकिस्तानला फायनल इशारा सुद्धा दिला. “पुन्हा असा दहशतवादी हल्ला झाला, तर त्याला Act of war मानण्यात येईल. आता भारताविरोधात सीमेपलीकडून कुठलीही कृती होणार नाही, असं ठरलय. पण आता काही केलं, तर बात दूर तक जायेंगी” हे राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केलं.