वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्स 2023-2025 स्पर्धेचा अंतिम सामना 11 जूनला होणार आहे. मागच्या दोन वर्षात एकूण नऊ संघात अंतिम फेरीत जागा मिळण्यासाठी चुरस पाहायला मिळाली. दक्षिण अफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरीत जागा मिळवली असून आता जेतेपद कोण मिळवणार याची उत्सुकता आहे. लॉर्ड्स मैदानात दक्षिण अफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया हे संघ आमनेसामने येणार आहेत. पण तिसऱ्या पर्वात मिळणाऱ्या बक्षिसाची मागच्या पर्वाच्या तुलनेत दुप्पट आहे. अंतिम सामन्यासाठी 5.76 मिलियन अमेरिकन डॉलरची बक्षिसी रक्कम जाहीर केली आहे. जेतेपद मिळवणाऱ्या संघाला 3.6 मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजेच 30.78 कोटी रुपये मिळणार आहेत. तर मागच्या पर्वात हीच रक्कम 1.6 मिलियन अमेरिकन डॉलर होती. तर उपविजेत्या संघाला 2.16 मिलियन अमेरिकन डॉलर इतकी बक्षिसी रक्कम मिळणार आहे. म्हणजेच 18.46 कोटी रुपये मिळणार आहेत. मागच्या पर्वात हीच रक्कम 8,00,000 अमेरिकन डॉलर (6.61 कोटी) होती.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-2025 स्पर्धेत दक्षिण अफ्रिकेने चांगली कामगिरी करत अव्वल स्थान गाठलं आहे. दक्षिण अफ्रिकेने पाकिस्तान, वेस्ट इंडिज, बांग्लादेश आणि श्रीलंकेविरुद्धची मालिका जिंकली. तर भारताविरूद्धची मालिका जिंकली आणि अव्वल स्थान गाठलं. तर ऑस्ट्रेलियाने बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेत भारताचा 3-1 ने पराभूत केलं. तर पाकिस्तानच्या 3-0 ने पराभवाची धूळ चारली. तसेच न्यूझीलंड, इंग्लंड आणि श्रीलंकेविरुद्ध चांगली कामगिरी करत टॉप 2 मध्ये स्थान मिळवलं. गुणतालिकेत टॉप 2 मध्ये असलेल्या संघांना अंतिम फेरीत खेळण्याची संधी मिळते. भारतीय संघ तिसऱ्या स्थानावर राहीला.
दक्षिण अफ्रिका : टेम्बा बावुमा (कर्णधार), डेव्हिड बेडिंगहॅम, कॉर्बिन बॉश, टोनी डी झोर्झी, मार्को जॅनसेन, केशव महाराज, एडन मार्कराम, विआन मुल्डर, सेनुरन मुथुसामी, लुंगी एनगिडी, डेन पॅटरसन, कागिसो रबाडा, रायन रिकेल्टन, ट्रिस्टन वेरिएन स्टुब्ले.
ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी , कॅमेरून ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंगलिस, उस्मान ख्वाजा, सॅम कॉन्स्टास, मॅट कुह्नेमन, मार्नस लाबुशेन, नॅथन लायन, स्टीव्ह स्मिथ, मिशेल स्टार्क, ब्यू वेबस्टर.