उंडवडी, ता. १५ : शासनाच्या विविध विभागांकडील ग्रामस्थांच्या विविध अडचणी दूर करण्यासोबतच त्यांच्या प्रलंबित असणाऱ्या स्थानिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सोमवार, १९ मे २०२५ रोजी तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे विठ्ठल मंदिर, जळगाव सुपे (ता. बारामती) येथे सकाळी ११ वाजता आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती तहसीलदार गणेश शिंदे यांनी दिली आहे.
नागरिकांचे प्रश्न तालुकास्तरावर मार्गी लावण्याच्या अनुषंगाने लोकशाही दिनाचे आयोजन केले आहे. या लोकशाही दिनात सर्व तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होऊन आपल्या हरकती, दावे या लोकशाही दिनात मांडाव्यात, असे आवाहन शिंदे यांनी केले आहे.