कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या मंत्री विजय शाह यांचा राजीनामा घेऊन त्यांना हाकलले का नाही? असा सवाल कर माजी मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपवर संताप व्यक्त केला.
Ramraje Naik Nimbalkar: रामराजे निंबाळकर यांच्या घरी पोलिस पोहचलेग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामी आणि खंडणी चौकशी प्रकरणात वडूज पोलीस (Vaduj Police) माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी चौकशीसाठी दाखल झाले आहेत.जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेसोबत रामराजे यांचे मोबाईलवर संभाषण झाल्याचे काही दिवसांपूर्वी उघड झाले होते.
Pune live: महापालिका आयुक्त करणार पालखी मार्गाची पाहणीपुढील महिन्यात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पंढरपूर च्या दिशेने मार्गस्थ होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सोमवारी पालखी मार्गाची पाहणी महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले करणार आहेत.
लष्कर आणि पोलिसांची कारवाईभारतीय लष्कराचे श्रीनगरमध्ये केलेल्या कारवाईत सहा दहशतवाद्यांच्या खात्मा केल्याचे लष्कराकडून पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. लष्कर आणि पोलिस यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली.
MVA Live: महाविकास आघाडी एकसंध ठेवण्याचा काँग्रेसचा प्रयत्नसध्या राज्यात दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण आणि ठाकरे बंधू एकत्र येतील अशी चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीला एकसंध ठेवण्याचा काँग्रेस प्रयत्न करीत आहे. यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. मातोश्रीवर जाऊन सपकाळ ठाकरेंची भेट घेणार आहेत. सपकाळ यांनी दोन दिवसांपूर्वी शरद पवारांची भेट घेतली होती.
दहावीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांची 'या' तारखेला पुरवणी परीक्षामहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आयोजित करण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी (ता. 13) जाहीर झाला. या निकालात अनेक विद्यार्थ्यांना घवघवीत यश मिळालं. तर काही विद्यार्थी नापास झाले. मात्र, नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एटीकेटी परीक्षा घेण्यात येणार आहे. दहावीच्या परीक्षेत नापास झालेले विद्यार्थी आणि श्रेणी सुधारू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 24 जून ते 17 जुलै दरम्यान पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे.
Jalna News : 5 लाखांची लाच घेणारा महसूल सहायक एसीबीच्या जाळ्यातजालन्यात 5 लाखांची लाच घेताना महसूल सहाय्यकाला लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने पकडले आहे. राजेंद्र शिंदे अस लाच घेणाऱ्या महसूल सहाय्यकाचं नाव आहे. तक्रारदाराचा दाव्याचा निकाल बाजूने लावण्यासाठी राजेंद्र शिंदेने पैशाची मागणी केल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी या लाचखोर महसूल सहाय्यकाविरोधात जालन्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बुलढाणा दौऱ्यावरराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्या दरम्यान ते बुलढाणा येथील भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यालयाचा भूमिपूजन करणार आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार सोमवारी बीड दौऱ्यावर जाणारराज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार सोमवारी बीडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समिती बैठकी तसेच खरीप हंगामाची बैठक घेणार आहेत.
Rajnath Singh : राजनाथ सिंह आज भुज एअरबेसची पाहणी करणारदेशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज गुजरातमधील भुज एअरबेसचा दौरा करणार आहेत. ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर ते सैन्याच्या शौर्याला सलाम करण्यासाठी गुजरातला जाणार आहेत. तसंच यावेळी सीमेवरील सुरक्षेचा आढावा देखील घेणार आहेत.