शहापूर तालुक्यातील कसारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ड्रोन पडल्याची घटना समोर आली आहे. यामुळे शहापूरमध्ये एकच खळबळ उडाली. फुगाळे गावाच्या डोंगरावर हे ड्रोन पडलेल्या अवस्थेत सापडले. या घटनेची माहिती मिळताच कसारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ड्रोन ताब्यात घेतले.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस ठाण्याच्या हद्दीतील फुगाळे गावानजीकच्या डोंगरावर ड्रोन पडलेल्या अवस्थेत गावकऱ्यांना दिसून आले. त्यामुळे आसपासच्या गावामध्ये एकच खळबळ उडाली. गावाकऱ्यांनी या ड्रोनबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलिस तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. प्रथामिक माहितीनुसार हा ड्रोन जलसंपदा विभागाचा असल्याचे समजते.
सांगितले की, कसारा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अतिदुर्गम भागातील फुगाळे गावानजीकच्या सह्याद्रीच्या डोंगरावर गावातील काही तरूण फिरायला गेले होते. त्यावेळी या डोंगरावर ड्रोन पडलेल्या अवस्थेत गावकऱ्यांना दिसून आले. सदर गावकऱ्यांनी कसारा पोलिसांशी संपर्क साधाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी या ड्रोनची तपासणी केली. हा ड्रोन जलसंपदा विभागाचा असल्याची प्राथमिक माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर कसारा पोलिसांनी हा ड्रोन ताब्यात घेतला असून पुढील तपास करत आहेत. दरम्यान, भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेतेच्या दृष्टीने राज्यभरात सगळीकडेच ड्रोन उडवण्यास बंदी घालण्यात आली आहे.