वानखेडे मैदानातील स्टँडला रोहित शर्मा, अजित वाडेकर आणि शरद पवार यांचं नाव, कार्यक्रमाला दिग्गजांची हजेरी
GH News May 16, 2025 08:12 PM

वानखेडे स्टेडियमवर तीन स्टँडचं नामकरण सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. तीन स्टँडला दिग्गजांची नावं देण्यात आली. रोहित शर्मा स्टँड, अजित वाडेकर स्टँड आणि माजी बीसीसीआय अध्यक्ष शरद पवार यांचं नाव स्टँडला देण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती. यासह मुंबई इंडियन्सचे खेळाडू, माजी टीम इंडियाचा कर्णधार रवि शास्त्री आणि दिलीप वेंगसरकर यासह इतर मान्यवर उपस्थित होते. रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटनंतर कसोटी फॉरमेटमधून निवृत्ती घेतली आहे. रोहित शर्मा टीम इंडियात आता फक्त वनडे क्रिकेट खेळताना दिसणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने रोहित शर्माच्या क्रिकेटमधील योगदानासाठी हा सन्मान दिला आहे. वानखेडे मैदानात रोहित शर्माने अनेक मोठ्या खेळी केल्या आहेत.

अजित वाडेकर यांनी 1971 मध्ये वेस्ट इंडिज आणि इंग्लंडमधील ऐतिहासिक परदेशातील कसोटी मालिकेत भारताचे नेतृत्व केले होते. त्यांनी 1966 ते 1974 दरम्यान 37 कसोटी आणि दोन एकदिवसीय सामने खेळले आणि 1958-59 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले होते. ऑगस्ट 2018 मध्ये वयाच्या 77 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

शरद पवार यांनी 2005 ते 2008 या कालावधीत बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषविले होते. तर 2011 मध्ये भारतात वनडे वर्ल्डकपचं आयोजन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.