विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 16 मे रोजी भारतीय शेअर बाजारातून 8831 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. 2025 मधील एका दिवसातील विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची दुसरी सर्वात मोठी खरेदी ठरली. एनएसईवरील आकडेवारीनुसार भारतीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 5187 कोटींची खरेदी केली.
2025 मध्ये विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1.10 लाख कोटींच्या शेअरची विक्री केलीय तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 2.31 लाख कोटींचे शेअर खरेदी केले आहेत. विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी गुरुवारी 5392.94 कोटी रुपयांची खरेदी केली होती.
बाजार बंद झाला तेव्हा बीएसई सेन्सेक्स 200.15 अंकांनी घसरुन 82330.59 वर बंद झाला. तर, एनएसई वरील निफ्टी 50 निर्देशांक 42.30 अकांनी घसरुन 25019.80 वर बंद झाला. बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 442.74 लाख कोटी इतकं झालं. काल जेव्हा बाजार बंद झाला तेव्हा बीएसईचं बाजारमूल्य 440.19 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच आज 2.55 लाख कोटींनी बाजारमूल्य वाढलं.
सेन्सेक्सवरील टॉप 30 पैकी 16 शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली. इटर्नलच्या शेअरमध्ये 1.38 टक्के तेजी दिसून आली. हिंदुस्तान यूनिलीव्हर, एशियन पेंटस, आयटीसी, टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये सर्वाधिक तेजी पाहायला मिळाली. भारती एअरटेल, एचसीएल टेक, स्टेट बँक ऑफ इंडिया, टेक महिंद्रा, इन्फोसिस, च्या शेअरमध्ये घसरण झाली.
जियोजीत इन्वेस्टमेंटस लिमिटेडचे रिसर्च हेड विनोद नायर यांच्यामते गुंतवणूकदारांच्या मते मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअरमध्ये मजबुती कायम आहे. रिअल इस्टेट, ऑटो, कंझ्यूमर ड्यूरेबल्समध्ये देखील कायम आहे. (टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
येथे प्रकाशित: 16 मे 2025 11:56 दुपारी (आयएसटी)
अधिक पाहा..