Operation Sindoor : हा तर ट्रेलर, पिक्चर अजून बाकी; युद्धविराम तुटणार? पाकिस्तानला का भरली धडकी, 18 मे रोजी काही तरी मोठं होणार?
GH News May 17, 2025 12:06 PM

Operation Sindoor : पाकच्या गयावयानंतर 10 मे रोजी भारताने पण युद्ध विरामाला संमती दिली. पण गेल्या 24 तासात पाकिस्तानमधील बडे नेते आणि खासदारांचे वक्तव्य काही वेगळाच संकेत देत आहेत. भारत, पाकमध्ये घुसून पुन्हा दहशतवाद्यांवर कारवाईची भीती त्यांना सतावत आहे. मग्रुर बिलावल भुट्टो असो वा युद्धाच्या वल्गना करणारे इतर पाकडे असतील. आता सर्वांना भारत पुन्हा स्ट्राईक करण्याची भीती वाटत आहे. तर काल भुजमध्ये बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हा ट्रेलर होता, पिक्चर अजून बाकी आहे, असा थेट संदेश दिला. त्यामुळे युद्ध विराम तुटण्याची शक्यता असल्याचा दावा करण्यात येत आहे. 18 मे ची पाकिस्तानला का भीती वाटत आहे, काय होणार उद्या?

या घडामोडी काय सांगतात?

युद्ध विराम झाल्याच्या 5 दिवसानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घुमजाव केले. आपण मध्यस्थी केली नसल्याचे सांगितले. तर दुसरीकडे पाक विजयी झाल्याचा खोटा ढोल बडवणारे शरीफ वठणीवर आले. भारताने घुसून हल्ला केल्याची जाहीर कबुली त्यांनी दिली. भारताशी चर्चेची तयार सुरू केली. तर पाकचे खासदार पुन्हा भारत हल्ला करण्याची शक्यता वर्तवत आहेत. दुसरीकडे राजनाथ सिंह यांच्या वक्तव्याने चर्चेला पेव फुटले आहे. या घटना काही तरी मोठ्या घडामोडी घडत असल्याचे इंगित करत आहेत.

18 मे रोजी काय मोठे घडणार?

18 मे रोजी काही मोठे घडणार आहे का? ऑपरेशन सिंदूरची स्पष्ट भीती आतापर्यंत गुरगुरणाऱ्या पाकच्या दहशतवाद्यांच्या थोबाडावर दिसून येत आहे. ते हादरले आहेत. भारत आपल्याला कधी नरकात पाठवेल याची स्पष्ट भीती त्यांच्या चेहर्‍यावर दिसून येत आहे. पाकिस्तानी खासदारांनी तर 18 मे रोजी मोठे काही तरी घडणार असे दावे सुरू केले आहेत. ऑपरेशन सिंदूरचा पार्ट -2 सुरू होणार असल्याची भीती त्यांना सतावत आहे. पाकिस्तानचे खासदार सय्यद शिबली फराज याने तर भारत आता शांत बसणार नाही, त्याला डिवचू नका. आपल्याला अधिक सतर्क राहावे लागेल असे विधान केले आहे.

उद्या DGMO ची बैठक

उद्या, 18 मे रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध विरामावर दोन्ही देशांच्या DGMO ची बैठक होत आहे. हा बैठकीचा चौथा टप्पा आहे. पण त्यापूर्वी ज्या काही घडामोडी घडल्या आहेत. त्यामुळे काही तरी मोठे घडणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही अभ्यासकांनी सुद्धा हा युद्ध विराम नाही तर युद्ध अल्पविराम असल्याचा दावा केला होता. आता काही दिवसात काय घडते यावरून चित्र स्पष्ट होईल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.