भारत आणि अमेरिकेमध्ये टॅरिफमुळे तणाव वाढलेला असतानाच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचा अत्यंत जवळचा मित्र आणि सहकारी सर्जियो गोर यांना भारताचा पुढचा अमेरिकी राजदूत म्हणून घोषित केले. यासोतच दक्षिण आणि मध्य आशियासाठी विशेष दूत म्हणूनही त्यांची नियुक्ती करण्यात आली. गोर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणुकीमध्ये महत्वाचे काम केले होते. ते डोनाल्ड ट्रम्प यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात.
‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ यासाठी तो चांगले काम करतील, असा विश्वास डोनाल्ड ट्रम्प यांना आहे. सध्याच्या परिस्थितीला अमेरिका आणि भारत यांच्यामध्ये व्यापारावरून तणाव आहे. हेच नाही तर व्यापार चर्चा देखील पूर्णपणे बंद आहे. अमेरिकी सचिन स्कॉट बेसेंट याने युक्रेन आणि रशियाच्या युद्धाला भारत कारणीभूत असल्याचे म्हटले होते. हेच नाही तर त्यांनी म्हटले की, रशियाच्या तेलातून भारत नफेखोरी करण्याचे काम करते. अनेक वर्ष चांगले भारत आणि अमेरिकेतील संबंध ताणले गेले आहेत.
यासोबतच पूर्वीप्रमाणे नाते होण्यासाठी मोठा कालावधी देखील लागणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल घेतलेल्या निर्णयानंतर भारतीयांचा विश्वास उडाला आहे. या काळात अनेक देश हे भारताच्या मदतीला धावून आली. हेच नाही तर जाहीरपणे काहींनी पाठिंबा भारताला दिला आणि आम्ही भारताच्यासोबत असल्याची भूमिका त्यांनी घेतली. अमेरिकेने 50 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतल्यानंतर चीन आणि भारतामधील जवळीकता वाढली आहे.
हेच नाही तर लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चीनच्या दाैऱ्यावर देखील जात आहेत. सध्याची परिस्थिती बघता डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचा राजदूत म्हणून सर्जिया गोर यांचे नाव जाहीर केले. 27 ऑगस्टपासून भारतावर 50 टक्के टॅरिफ लागू केला जाणार आहे. दुसरीकडे भारत आपल्या टॅरिफच्या अटी आणि इतर अटी मान्य करत नसल्याने अमेरिकाचा जळफळाट उटला आहे. अमेरिकेकडून भारतावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका ही केली जात आहे. सध्याच्या परिस्थितीली टॅरिफचा वाद हा टोकाला गेल्याचे बघायला मिळत आहे.