Shirdi : घरगुती वाद, पतीकडून पत्नीची हत्या; नंतर भिंतीवर मजकूर लिहून पतीनं आयुष्य संपवलं
Saam TV August 23, 2025 11:45 AM
  • अहिल्यानगरच्या कोपरगाव तालुक्यात घरगुती वादातून पतीने पत्नीची हत्या केली.

  • घटनेनंतर पती घरात मृत अवस्थेत आढळून आला असून भिंतीवर मजकूर लिहिला होता.

  • या दुहेरी मृत्यूमुळे चासनळी गावात मोठी खळबळ उडाली असून पोलिस तपास सुरू आहे.

  • संजय बनसोडे, साम टीव्ही, प्रतिनिधी

    Shocking : अहिल्यानगरहून एक धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. पत्नीसोबत वाद झाल्यानंतर पतीने पत्नीची हत्या केली आणि त्यानंतर गळफास घेऊन स्वत:चे आयुष्य संपवले. घराच दोघांचेही मृतदेह आढळून आल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली. ही घटना अहिल्यानगरच्या कोपरगाव तालुक्यामध्ये घडल्याची माहिती समोर आली आहे.

    कोपरगाव तालुक्यातील चासनळी गावात सदर घटना घडली आहे. गावातील रहिवासी दिलीप शंकर मुजगुळे आणि त्यांची पत्नी स्वाती मुजगुळे या दांपत्याचे मृतदेह घरात आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली. स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती आणि कोपरगावचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला.

    Auto News : वाहनचालकांना दिलासा! २० वर्षे जुनी गाडी चालवता येणार, सरकारचा मोठा निर्णय

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप आणि स्वाती यांच्यामध्ये वाद झाला होता. भांडणाच्या रागात पती दिलीप याने स्वातीला मारहाण केली. त्यानंतर उशी वापरुन नाकतोंड दाबत स्वातीची हत्या केली. दिलीपने आपल्याला होणारा त्रास याबाबत घरातील भिंतीवर मजकूर लिहीला आणि गळफास घेत स्वत:चे आयुष्य संपवले.

    Crime : शाळेत गोळीबाराचा थरार! कानाखाली मारल्याचा राग, विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी

    एका घरामध्ये दांपत्यांचे मृतदेह आढळल्याने चासनळी गावात खळबळ उडाली आहे. घरगुती भांडणानंतर पतीने पत्नीची हत्या केली. त्यानंतर गळफास घेत पतीने देखील आत्महत्या केली असे प्रथमदर्शनी दिसत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. कोपरगाव तालुका पोलीस या घटनेचा अधिकचा तपास करत आहेत.

    POCSO : अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार, पोक्सो न्यायालयाने महिलेला सुनावली २० वर्षांची शिक्षा
    © Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.