चीनी कंपनी itel ने भारतात आपला आणखी स्वस्त आणि मस्त फोन लाँच केला आहे. आयटेल कंपनीने हा फोन 6,000 रुपयांपेक्षा कमी रुपयात आणला आहे.या फोनमध्ये आयफोन सारखे फिचर्स दिले आहेत. itel Zeno सिरीजचा हा लेटेस्ट फोन आयफोन सारखा डायमिक आयलँड डिस्प्ले फिचर सह आला आहे. या फोनमध्ये दमदार 5000mAh बॅटरी दिलेली आहे. तसेच अनेक तगडे फिचर्स दिलेले आहेत.
itel Zeno 20 भारतात 5,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच केले आहे. आयटेलचा हा फोन दोन स्टोरेज व्हेरिएंट्स 3GB RAM + 64GB आणि 4GB RAM + 128GB मध्ये येतो. या फोनच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 6,899 रुपये आहे. हा फोन Aurora Blue, Starlit Black आणि Space Titanium या कलरमध्ये उपलब्ध आहे. या फोनची विक्री ई- कॉमर्स वेबसाईट अमेझॉनवर 25 ऑगस्टपासून सुरु होत आहे. या पहिल्या सेलमध्ये या फोन खरेदी करणाऱ्यांना तीनशे रुपयांपर्यंतची सुट मिळणार आहे.
itel Zeno 20 चे भन्नाट फिचर्सहा फोन 6.6 इंचाच्या HD+ IPS डिस्प्लेसह आला आहे.या फोनचा डिस्प्लेत डायनामिक आयलँड दिला आहे. तसेच हा डिस्प्ले 90Hz हाय रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या फोनमध्ये दिलेल्या डायनामिक बारमध्ये कॉल, बॅटरी आणि चार्जिंग नोटीफिकेशन मिळणार आहेत. या फोनमध्ये ड्युअल 4G सिम कार्ड लावता येते.
आयटेलचा हा स्वस्त फोन Unisoc T7100 चिपसेटवर काम करतो. यात 4GB रॅम आणि 128GB इंटर्नल स्टोरेजचा सपोर्ट मिळत आहे. या फोनमध्ये फेस अनलॉक फिचर दिलेले आहे. तसेच हा IP54 रेटेड फोन असून यात DTS साऊंडचा सपोर्ट मिळत आहे.
हा फोन Aivana 2.0 व्हॉईस असिस्टंट फिचर्ससह येतो. आणि यात Android 14 Go ऑपरेटींग सिस्टीम दिलेली आहे. या फोनमध्ये 5000mAh बॅटरी क्षमता आहे. तसेच 15W USB Type C चार्जिंग फिचर आहे. फोनच्या बॅकला 13MP कॅमेरा दिलेला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात 8MP कॅमेरा देण्यात आलेला आहे.