86315
देवगड प्रशालेत रंगला
''मिले सुर मेरा तुम्हारा''
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २२ ः येथील आर्ट सर्कल देवगड आणि स्वरऋतू निर्मित ‘मिले सुर मेरा तुम्हारा’ हा देशभक्तिपर गीतांचा कार्यक्रम येथे रंगला. विविध गीतांनी उपस्थितांमध्ये देशसेवेची स्फूर्ती जागवली. बाहेर पाऊस सुरू असतानाच बहारदार गीतांच्या सादरीकरणासाठी उत्स्फूर्तपणे रसिकांच्या टाळ्यांचा पाऊस पडला.
येथील शेठ म. ग. हायस्कूलच्या गुरुदक्षिणा प्रेक्षागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये प्रसाद शेवडे, विनायक ठाकूर, विश्वजित सातवळेकर, राधा जोशी, सावनी शेवडे, निशा धुरी यांनी विविध गीते सादर केली. त्यांना सिंथेसायझर साथ सचिन जाधव आणि प्रसाद जाखी यांनी, हार्मोनियम साथ हर्षद जोशी, तबला सौरभ वेलणकर, अभिनव जोशी, ढोलकी साथ विकास नर यांनी तर ऑक्टोपॅड साथ आदर्श सावंत यांनी केली. विविध देशभक्तीपर गीतांनी उपस्थित श्रोत्यांमध्ये देशसेवेची स्फूर्ती जागवली गेली. निवेदन संजय कात्रे यांनी केले.