पंचांग -
शनिवार : वैशाख कृष्ण ५, चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा, चंद्रराशी धनू/मकर, सूर्योदय ५.४६, सूर्यास्त ७, चंद्रोदय रात्री ११.१७, चंद्रास्त सकाळी ९.०९, भारतीय सौर वैशाख २७ शके १९४७.
दिनविशेष -
२००२ - तेनसिंग नोर्गे यांचा नातू ताशी वांगचुक याच्यासह ५४ गिर्यारोहकांनी एकाच दिवशी ‘माउंट एव्हरेस्ट’ या सर्वोच्च शिखरावर चढाई करीत विक्रम नोंदविला. एकाच दिवशी ५४ गिर्यारोहकांनी या शिखरावर चढाई करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
२०११ - राष्ट्रकुल पदकविजेत्या अन्नुराज सिंगने फोर्ट बेनिंग विश्वकरंडक स्पर्धेतील दहा मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत रौप्यपदक जिंकत लंडन ऑलिंपिकसाठी भारतास पाचवा कोटा मिळवून दिला.