Defense Budget: ऑपरेशन सिंदूरनंतर डिफेन्स बजेटमध्ये 50,000 कोटींची होणार वाढ! एकूण खर्च जाणार तब्बल 7 लाख कोटींच्यावर
esakal May 16, 2025 10:45 PM

Defense Budget: भारत-पाकिस्तान दरम्यान सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तसंच ऑपरेशन सिंदूरनंतर भारताच्या डिफेन्स बजेटमध्ये 50,000 कोटींनी वाढ होण्याची शक्यता आहे. पुरवणी मागणीद्वारे बजेटमध्ये या अतिरिक्त खर्चाच्या तरतुदीचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. याला खर्चाला येत्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मंजुरी मिळू शकते. या अतिरिक्त बजेटचा वापर नवीन शस्त्रं खरेदी आणि दारूगोळा खरेदी करण्यासाठी तसंच तंत्रज्ञानासाठी खर्च केला जाईल, अशी माहिती मिळते आहे.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, डिफेन्स बजेच्या या अतिरिक्त खर्चाचा वापर सशस्त्र दलांच्या गरजा, आवश्यक शस्त्रे आणि दारुगोळा खरेदी तसंच संशोधन आणि विकासासाठी वापर केला जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या वर्षी, संरक्षणासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात ६.८१ लाख कोटी रुपयांची विक्रमी तरतूद करण्यात आली होती, जी मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत ९.५३ टक्के जास्त आहे. भाजपप्रणइत एनडीए सरकार केंद्रात सत्तेत आल्यापासून, गेल्या १० वर्षांत संरक्षण बजेटमध्ये जवळजवळ तिप्पट वाढ झाली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.