वाशी तालुक्यातील पिंपळगाव लिंगी येथे विनापरवाना व अवैध,अनाधिकृत पणे साठवुन ठेवलेला ४५७ बॅग २० मेट्रिक टन खतसाठा जप्त करण्यात आला आहे. कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय व तालुका स्तरीय भरारी पथकाने संयुक्त कारवाई केली आहे. दोघांविरुद्ध वाशी पोलिसात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
Live : अवकाळी पावसामुळे रायगडमध्ये आंबा पीक धोक्यातरायगड जिल्ह्याच्या सर्वच भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.
पुढे अजून दोन दिवस कोकण किनारपट्टीवरील अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
सध्या कोकणात शेवटच्या टप्प्यातील आंब्याचा हंगाम सुरू झाला असून या अवकाळी पावसाचा फटका शेवटच्या टप्प्यातील आंबा उत्पादनाला बसतो आहे.
Mumbai Live: परदेशात नोकरीचे आमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक; मालाडमध्ये तिघांविरोधात गुन्हा दाखलमालाडमध्ये परदेशात नोकरी देण्याचे आमिष दाखवून शंभरहून अधिक बेरोजगार तरुणांची फसवणूक करणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एचन ओवरसीस नावाने कार्यालय थाटून आरोपींनी प्रत्येकी चार लाख रुपये उकळले. बनावट कागदपत्रे, व्हॉट्सअॅपवर पाठवलेले फसवे ऑफर लेटर आणि व्हिसा डॉक्युमेंट्स वापरून त्यांनी बेरोजगार तरुणांची दिशाभूल केली. अमन कमलमिया शेख, जिग्नेशकुमार राठवा आणि एकता अहिरे उर्फ दृष्टी उर्फ मनिषा अशी या आरोपींची नावे असून गुन्हा नोंदवताच ते तिघेही फरार झाले आहेत. सध्या मालाड पोलीस त्यांचा शोध घेत असून हा घोटाळा कोट्यवधी रुपयांचा असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
China Earthquake : चीनमध्ये ४.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपभारतीय वेळेनुसार, आज सकाळी ६:२९ वाजता चीनमध्ये ४.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याची माहिती राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने दिली.
बंगळूर : सात सरकारी अधिकाऱ्यांविरुद्ध बेहिशेबी मालमत्ता आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकरणी लोकायुक्त पोलिसांनी राज्यातील विविध भागांत छापे टाकले. अधिकाऱ्यांनी बंगळूरमध्ये १२, तुमकूरमध्ये ७, बंगळूर ग्रामीणमध्ये ८, यादगीरमध्ये ५, मंगळूरमध्ये ४ आणि विजयपूरमध्ये ४ आदी ४० ठिकाणांवर छापे टाकले आणि रोख रक्कम, सोने, चांदीचे दागिने, वाहने, घरे आणि जमिनीच्या नोंदींसह कोट्यवधी रुपयांची बेकायदेशीर मालमत्ता जप्त केली.
Almatti Dam : 'आलमट्टी' उंचीप्रश्नी आज निर्धार बैठक, अंकली फाटा येथे रविवारी रास्ता रोको आंदोलनसांगली : आलमट्टी धरणाची उंची, सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात येणारा महापूर या अनुषंगाने आज (ता. १६) येथे सर्वपक्षीय कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्था पदाधिकारी यांची बैठक होत आहे. आमदार अरुण लाड यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत येत्या रविवारी (ता. १८) अंकली फाटा येथे होणाऱ्या रास्ता रोको आंदोलनाचे नियोजनही करण्यात येणार आहे. ही माहिती कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील यांनी दिली आहे.
Ratnagiri Weather Update : रत्नागिरी जिल्ह्यात तीन दिवस यलो अलर्ट जारीरत्नागिरी : जिल्ह्यात वळवाच्या पावसाचा जोर १८ मेपर्यंत राहील, असा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तविला आहे. त्यामुळे सुरक्षिततेसाठी जिल्हा प्रशासनाने या कालावधीत यलो अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि वीजाही चमकण्याची शक्यता आहे.
Pune News पुण्याच्या कात्रज चौकात लाकडी दांडा घेऊन एकमेकांना मारहाण; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलपुण्याच्या कात्रज चौकामध्ये लाकडी दांडा घेऊन एकमेकांना मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काल दुपारी ही मारहाण झाल्याची माहिती मिळत आहे.
Waqf Act : 'वक्फ'वरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने २० मे'पर्यंत टाकली लांबणीवरनवी दिल्ली : सुधारित वक्फ कायद्याला आव्हान देत दाखल झालेल्या याचिकांवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने २० मेपर्यंत लांबणीवर टाकली आहे. याबाबतच्या आक्षेपांवर सरकारकडून उत्तरादाखल करण्यात आले असल्याची माहिती सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्या. ऑगस्टीन मसीह यांच्या खंडपीठाला दिले. ‘‘हे प्रकरण प्रलंबित आहे तोवर आधी दिलेल्या निर्देशानुसार ‘जैसे थे’ स्थिती ठेवली जावी,’ असे गवई यांच्याकडून सांगण्यात आले.
Weather Update LIVE : मॉन्सून अरबी समुद्रात दाखल, 27 मे पर्यंत केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता!पुणे : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) गुरुवारी अरबी समुद्रात दाखल झाले आहेत. मालदीवच्या काही भागासह श्रीलंकेच्या किनारपट्टीपर्यंत मॉन्सूनने प्रगती केल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. अंदमान बेटे आणि बंगालच्या उपसागरातही मॉन्सूनने चाल केली आहे. मॉन्सूनचा प्रवास वेगाने होत असून, २७ मेपर्यंत तो केरळमध्ये पोहोचण्याची चिन्हे आहेत.
ISRO LIVE : 'इस्रो' येत्या रविवारी अवकाशात सोडणार १०१ वा उपग्रहचेन्नई : भारतीय अवकाश संशोधन संस्था ‘इस्रो’ येत्या रविवारी (ता. १८) देशाचा १०१ वा उपग्रह अवकाशात सोडणार असल्याची माहिती या संस्थेचे प्रमुख व्ही. नारायणन यांनी दिली. ‘‘आम्ही जानेवारीमध्ये श्रीहरीकोटा येथून शंभरावा उपग्रह अवकाशात सोडला होता. आता भूनिरीक्षण उपग्रह ‘रिसॅट-१८’ हा १०१ वा उपग्रह ‘पीएसएलव्ही सी-६१’ या प्रक्षेपकाद्वारे १८ मे रोजी सोडला जाणार आहे,’ असे नारायणन यांनी जाहीर केले.
Donald Trump LIVE : आयफोन भारतात नेऊ नका, अमेरिकेत गुंतवणूक करा; अध्यक्ष ट्रम्प यांचा कंपनीचे सीईओ टीम कूक यांच्यावर दबावLatest Marathi Live Updates 16 May 2025 : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) गुरुवारी अरबी समुद्रात दाखल झाले आहेत. मालदीवच्या काही भागासह श्रीलंकेच्या किनारपट्टीपर्यंत मॉन्सूनने प्रगती केल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. अंदमान बेटे आणि बंगालच्या उपसागरातही मॉन्सूनने चाल केली आहे. मॉन्सून २७ मे पर्यंत केरळमध्ये पोहोचण्याची चिन्हे आहेत. तसेच ‘आयफोनचे उत्पादन अमेरिकेतच केले जावे त्याला भारतामध्ये नेऊ नका, ॲपलची उत्पादने तिथे तयार व्हावीत असे मला वाटत नाही. भारत स्वतःची काळजी घेण्यासाठी सक्षम आहे,’ असे सांगत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘अॅपल’ कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) टीम कूक यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. आलमट्टी धरणाची उंची, सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात येणारा महापूर या अनुषंगाने आज सांगलीत सर्वपक्षीय कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्था पदाधिकारी यांची बैठक होत आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था ‘इस्रो’ येत्या रविवारी (ता. १८) देशाचा १०१ वा उपग्रह अवकाशात सोडणार असल्याची माहिती या संस्थेचे प्रमुख व्ही. नारायणन यांनी दिली. माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे आता नव्या भूमिकेमध्ये दिसणार आहेत. ‘नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी’ दिल्लीकडून (एनएलयू) त्यांची सन्माननीय प्राध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सुधारित वक्फ कायद्याला आव्हान देत दाखल झालेल्या याचिकांवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने २० मेपर्यंत लांबणीवर टाकली आहे. त्याचबरोबर राज्यातील वातावरणात बदल पहायला मिळत आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..