पाकनं साडे आठ हजार कोटींसाठी IMF कडे हात पसरले,भारत सरकारला न मागता 20 पट रक्कम मिळणार
Marathi May 16, 2025 11:25 PM

<एक शीर्षक ="नवी दिल्ली" href ="https://marathi.tezzbuzz.com/topic/new-delhi" डेटा-प्रकार ="इंटरलिंकिंगकेवर्ड्स">नवी दिल्ली : पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून साडे आठ हजार कोटी रुपयांचं कर्ज घेण्यासाठी उंबरठे झिजवावे लागले. त्याच्या 20 पट रक्कम भारत सरकारला भेट म्हणून मिळणार आहे. पाकिस्ताननं आयएमएफकडून कर्ज घेतलं त्याची परतफेड करावी लागणार आहे भारत सरकारला जी रक्कम मिळणार आहे ती परत करावी लागणार नाही. अर्थतज्ज्ञांच्या मते रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सरकारला एक मोठी रक्कम देऊ शकते.  

पाकिस्तानला किती रक्कम मिळाली?

10 मे रोजी आयएमएफनं पाकिस्तानला 1 अब्ज डॉलर्सचं कर्ज मंजूर केलं होतं. जे पाकिस्तानसाठी मंजूर केलेल्या 7 अब्ज डॉलर्सच्या कर्जाचा दुसरा हप्ता होता. आयएमएफनं 2023 मध्ये पाकिस्तानला 7 अब्ज डॉलर्सचं कर्ज मंजूर केलं होतं.  दरवर्षी कर्जाच्या रकमेचा हप्ता पाकिस्तानला दिला जातो. याशिवाय आयएमएफनं पाकिस्तानला रेजिलिएंस अँड सस्टेनेबिलिटी फॅसिलिटीच्या रुपात 1.4 अब्ज डॉलर्सचं अतिरिक्त कर्ज देखील मंजूर केलं आहे. म्हणजेच पाकिस्तानला 10 मे रोजी  2.4 अब्ज डॉलर्सचं कर्ज दिलं आहे.  

भारत सरकारला किती रक्कम मिळणार?

अर्थतज्ज्ञांच्या मते आरबीआय भारत सरकारला लाभांश म्हणून 36 अब्ज डॉलर्स म्हणजेच तीन लाख कोटी रुपये लाभांश म्हणून देऊ शकते. आरबीआयनं 2024 मध्ये भारत सरकारला 2.1 लाख कोटी रुपये लाभांश म्हणून दिले होते.  

आरबीआय अतिरिक्त उत्पन्नातून सरकारला लाभांश देते. जे उत्पन्न आरबीआयला गुंतवणूक आणि डॉलर खरेदी विक्रीतून मिळते. याशिवाय चलन छापण्याच्या फीचा समावेश देखील आहे. आरबीआयला जो नफा मिळतो त्यातील काही रक्कम सरकारला दिली जाते.  

कॅनरा बँकेचे चीफ इकोनॉमिस्ट माधवनकुट्टी जी ग्रुपनं म्हटलं की आरबीआयनं विदेशी चलन परिचालन आणि रेपो ऑपरेशनमधून मोठी रक्कम कमावली आहे. आरबीआयच्या सरप्लस इनकम किंवा लाभांशाबाबात उत्सुकता  आहे कारण आरबीआयनं मोठ्या प्रमाणात डॉलरची विक्री केली आहे. ज्यामुळं उत्पन्नात वाढीची अपेक्षा आहे. 

आरबीआयनं एप्रिल 2024 ते फेब्रुवारी 2025 दरम्यान 371.551 अब्ज डॉलरच्या डॉलर्सची विक्री केली होती. तर, 322.685 डॉलर्सची खरेदी केली होती. यामुळं चांगल्या उत्पन्नाची आशा आहे. आरबीआयनं जेव्हा डॉलर खरेदी केले तेव्हा त्याची किंमत कमी होती. मात्र, किंमत वाढल्यानंतर त्याची विक्री केली. यामुळं आरबीआयचा नफा वाढला. 

<एक href ="https://marathi.tezzbuzz.com/photo-gallery/business/share-market-today-sensex-and-nifty-50-d-but-bse-Market--value-increased-to-mid-cap-cap--shelare-marathi-1359438">सेन्सेक्स 200 अंकांनी कोसळला मात्र गुंतवणूकदारांनी 2.5 लाख कोटी कमावले, स्मॉल कॅप शेअरधारकांची जोरदार कमाई

<एक href ="https://marathi.tezzbuzz.com/business/tata-stocks-dividend-2025-tata-to-tcs-10-companies- announce-payauts- नंतर-क्वार्टर -4-रिझल्ट-चेक-डिटेल-इन-मरथी -1359425">Tata Stock Dividend : टाटा स्टील ते टीसीएस, टाटा ग्रुपच्या 10 कंपन्यांकडून लाभांश जाहीर, सर्वाधिक लाभांश कोणत्या स्टॉकवर मिळणार?

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.