Beed Accident : भरधाव कंटेनरची ८-१० वाहनांना धडक, एकाचा चिरडून मृत्यू, नागरिकांनी कंटेनर पेटवला; बीडमध्ये भीषण अपघात
Saam TV May 17, 2025 04:45 AM

बीड : बीड जिल्ह्यातील केजमध्ये भीषण अपघाताची घटना घडली असून एका भल्यामोठ्या कंटनरने ८ ते १० गाड्यांना धडक दिली. या घटनेनंतर स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त करत कंटनेरच पेटवला. केजमध्ये कंटेनरनं दिलेल्या धडकेत एकाला चिरडलं असून १५ ते २० जण जखमी झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली. केजहून अंबाजोगाईकडे येत असताना कंटेनरनं लोखंडी सावरगावजवळ इतर गाड्यांना धडक दिल्यानं अपघात घडला, त्यात ८ ते १० गाड्यांना धडक देण्यात आली.

कंटेनरचाचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून १५ ते २० जण जखमी असल्याची माहिती आहे. अपघातातील जखमींवर आणि येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गाड्यांना धडक दिल्यानंतर पुढे अंबाजोगाईजवळील लोखंडी सावरगाव जवळ हा कंटेनर पलटी झाला आहे. अपघाताच्या घटनेनं जमाव संतप्त झाला होता. त्यामुळे, कंटेनर पलटी झाल्यानंतर लोखंडी सावरगावजवळ संतप्त जमावाने कंटेनर पेटवला. दरम्यान, कंटेनर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

अपघातातील जखमी व एक मयत

कृष्णा हरिदास कापरे, कापरेवाडी २०

श्रद्धा मधुकर चिंचकर १८ येवता

सुनील सुंदर घुले ५९ केळगाव

बळीराम अप्पराव पांचाळ ४० ढाकेफळ

सोनू बाबु शेख २० केज

विकास वसुदेव काकडे २२ कापरेवाडी

कुमार गायकवाड ५५ देवगाव

शेषेराव मारुती चंदनशिवे ५५ शिरपुरा

सरिता रावसाहेब मुंडे ५७ चारदरी

फुलाबाई धोंडीराम सावंत ६० तुगाव

रावसाहेब यादवराव मुंडे ७० चारदरी

विद्या विलासराव सूर्यवंशी ३० पी

विलासराव ज्ञानोबा सूर्यवंशी ४० पी

सिद्धेश्वर वसुदेव कापरे २२ युसुफवडगाव

सिद्धार्थ शिंदे ५२ (पोलिस) युसुफवडगाव

अतुल बाबुराव कुलकर्णी ४० तांबवा

मीना प्रवीण घोडके ३७ टाकळी/चिंचोली माळी (मयत)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.