पुणे - राज्य सरकारच्या गृह विभागाकडून प्रशासकीय कारणास्तव भारतीय पोलिस सेवेतील (आयपीएस) २६ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश शुक्रवारी (ता. १६) काढण्यात आला. त्यात प्रामुख्याने पुणे शहरातील गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे यांची मुंबई शहर गुन्हे शाखेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती केली आहे.
अतिरिक्त आयुक्त प्रवीण पाटील यांची नागपूर शहर अतिरिक्त आयुक्तपदी, अतिरिक्त आयुक्त (प्रशासन) अरविंद चावरिया यांची अमरावतीच्या पोलिस आयुक्तपदी तर, पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांची पुणे शहर पोलिस दलात अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे.
अन्य वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची नावे (कंसात बदलीचे ठिकाण) -
अनिल पारसकर- अतिरिक्त आयुक्त (मुंबई), एम. रामकुमार- संचालक राज्य गुप्तवार्ता प्रबोधिनी (पुणे), शशिकुमार मीना- अतिरिक्त आयुक्त (मुंबई), संजय पाटील- अतिरिक्त आयुक्त (पुणे), वसंत परदेशी- अतिरिक्त आयुक्त (पिंपरी-चिंचवड), सारंग आव्हाड- पोलिस उपमहानिरीक्षक (पिंपरी चिंचवड), एस.टी. राठोड- पोलिस उपमहानिरीक्षक (अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स), पी. पी. शेवाळे- पोलिस उपमहानिरीक्षक (एटीएस मुंबई), विनिता साहू- अतिरिक्त आयुक्त (सशस्त्र पोलिस दल, मुंबई).
पोलिस उपमहानिरीक्षक श्रेणीत पदोन्नती, अधिकाऱ्यांची नावे -
प्रसाद अक्कानवरू- राज्य सुरक्षा महामंडळ (मुंबई), अमोघ गावकर- सीआयडी प्रशासन (पुणे), जी. श्रीधर- पोलिस दळणवळण, माहिती तंत्रज्ञान (पुणे), मोक्षदा पाटील- राज्य राखीव पोलिस बल (मुंबई), राकेश कलासागर-पोलिस आयुक्त (लोहमार्ग, मुंबई), प्रियांका नारनवरे- अतिरिक्त आयुक्त वाहतूक (मुंबई), अरविंद साळवे- सहसंचालक राज्य पोलिस अकादमी (नाशिक), सुरेशकुमार मेंगडे- मुख्य दक्षता अधिकारी, सिडको (नवी मुंबई), धनंजय कुलकर्णी- अतिरिक्त आयुक्त, विशेष शाखा (मुंबई), विजय मगर- पोलिस उपमहानरीक्षक, राज्य राखीव पोलिस बल (पुणे), राजेश बनसोडे- अतिरिक्त आयुक्त (पुणे), विक्रम देशमाने- अतिरिक्त आयुक्त (मुंबई), राजेंद्र दाभाडे- अतिरिक्त आयुक्त (नागपूर).