Hyundai Motor India Q4 Results : मार्च तिमाहीत नफा घटला, पण कंपनी देणार मोठा लाभांश
ET Marathi May 17, 2025 06:45 PM
मुंबई : ह्युंदाई मोटर इंडियाने जानेवारी-मार्च २०२५ या तिमाहीचे निकाल (Hyundai Motor India Q4 Results) जाहीर केले आहेत. यासोबतच कंपनीने आपल्या भागधारकांना खूशखबर दिली आहे. ह्युंदाई मोटरने लाभांश जाहीर केला आहे. मार्च तिमाहीत ह्युंदाई मोटर इंडियाचा निव्वळ एकत्रित नफा १६१४.३४ कोटी रुपयांवर गेला आहे. गेल्या वर्षीच्या १६७७.१७ कोटी रुपयांच्या नफ्यापेक्षा हा आकडा ४ टक्के कमी आहे. इतका लाभांश जाहीरह्युंदाई मोटर इंडियाच्या संचालक मंडळाने आर्थिक वर्ष २०२५ साठी शेअरधारकांना प्रति शेअर २१ रुपये अंतिम लाभांश ( Hyundai Motor India dividend) देण्याची शिफारस केली आहे. कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत यावर भागधारकांची मान्यता घेतली जाईल. कंपनीच्या शेअर्सची दर्शनी किंमत १० रुपये आहे. तिमाहीतील महसूलगेल्या वर्षीच्या तुलनेत कंपनीच्या कामकाजातून एकत्रित महसूल १.५ टक्क्यांनी वाढून १७,९४०.२७ कोटी रुपये झाला. एक वर्षापूर्वी महसूल १७६७१.१४ कोटी रुपये होता. मार्च २०२५ च्या तिमाहीत कंपनीचा खर्च १५९७४.४६ कोटी रुपये होता, जो मार्च २०२४ च्या तिमाहीत १५७४४.६२ कोटी रुपये होता. EBITDA वाढून २५३२.७ कोटी रुपये झाला. एक वर्षापूर्वी हा आकडा २५२१.८ कोटी रुपये होता. मार्च २०२४ च्या तिमाहीत १४.३ टक्क्यांवरून EBITDA मार्जिन १४.१ टक्के नोंदवले गेले. आर्थिक वर्षातील नफा ह्युंदाई मोटर इंडियाचा निव्वळ एकत्रित नफा २०२४-२५ या संपूर्ण आर्थिक वर्षात ५६४०.२१ कोटी रुपये राहिला आहे. एक वर्षापूर्वी नफा ६०६० कोटी रुपये होता. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये ६९८२९ कोटी रुपयांवरून कामकाजातून एकत्रित महसूल ६९१९२.८८ कोटी रुपये नोंदवण्यात आला. शेअर्स वधारलाह्युंदाई मोटर इंडियाचे शेअर्स (Hyundai Motor India share price) १६ मे रोजी बीएसईवर १ टक्क्यांहून अधिक वाढीसह १८५९.९५ रुपयांवर बंद झाले. कंपनीचे मार्केट कॅप १.५१ लाख कोटी रुपये आहे. मार्च २०२५ अखेर कंपनीमध्ये प्रवर्तकांचा ८२.५० टक्के हिस्सा होता. गेल्या एका महिन्यात या शेअरमध्ये १३ टक्के आणि फक्त एका आठवड्यात ७ टक्के वाढ झाली आहे.
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.