केंद्र सरकार सर्व पक्षांच्या खासदारांच्या सात शिष्टमंडळांना परदेश दौऱ्यावर पाठवणार आहे. प्रत्येक टीममध्ये 5 खासदार असतील. यातील एका खासदाराकडे त्या ग्रुपचं नेतृत्व सोपवण्यात येणार आहे. संसदीय कार्य मंत्रालयाने शनिवारी या टीम लीडर्सची नावे जाहीर केली. या यादीत भाजपचे दोन, काँग्रेस, डीएमके, जेडीयू, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांचे प्रत्येकी एक खासदार आहेत. पाकिस्तान विरुद्धच्या ऑपरेशन सिंदूरविषयी हे खासदार दहशतवादाबाबत भारताचा संदेश जगभर देतील. या मोहिमेचे नेतृत्व खासदार शशी थरूर करणार आहेत.
भारतीय लष्करातील महिलांवर टीका करणे चुकीचे - अजित पवारपहेलगाम मध्ये अतिरेक्यांनी अनेकांना मारलं पण याचा बदला घेतला पाहिजे आणि मास्टरमाईंड शोधून त्यांना संपवलं पाहिजे अशी भावना आपली होती. त्यावेळी भारत पाकिस्तान मध्ये युद्ध झालं आपण सगळेजण देशाचे मनोधैर्य वाढवण्याचे काम करत होतो .त्याही वेळी भारतीय लष्करातील दोन महिलांनी मीडिया समोर येऊन माहिती दिली.काही लोकांनी त्यांच्यावर टीका केली, हे चुकीच आहे. आम्हाला याचं वाईट वाटत आहे.
पुणे भाजपात अंतर्गत वाद? शहराध्यक्षांच्या कार्यक्रमाला पदाधिकार गैरहजरभाजपचे पुणे शहराध्यक्षपदी धीरज घाटे यांना नियुक्तीपत्र देण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या कार्यक्रमाला बहुतांश शहर पदाधिकाऱ्यांंनी आणि नगरसेवकांनी पाठ फिरवल्याचे चित्र होते.
नूर खान एअरबेसवर हल्ल्याची पंतप्रधान शरीफ यांची कबुलीपाकिस्तानच्या संसदेच पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी कबूल दिली की भारताने नूर खान एअरबेसवर हल्ला केला होता. शरीफ यांनी सांगितले की १० मे रोजी पहाटे २:३० वाजता जनरल असीम मुनीर यांनी त्यांना फोन करून भारतीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी नूर खान एअरबेस आणि इतर काही भागात हल्ला केल्याची माहिती मला दिली.
कात्रज विकास आघाडीच्या नेत्यांचा शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेशपुणे जिल्ह्यातील कात्रज विकास आघाडीचे संस्थापक नमेश बाबर, अध्यक्ष स्वराज बाबर आणि त्यांचे असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.यावेळी त्यांच्यासह अनिल कोंढरे, गणेश मोहिते, सिद्धार्थ वंशी, तानाजी दांगट, निलेश धनावडे, नितीन कोमन, गणपततात्या गुजर, भालचंद्र पवार आणि उपमहाराष्ट्र केसरी माऊली कोकाटे आणि ग्रीक रोमन महाराष्ट्र केसरी संग्राम बाबर यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला.
पुणे पोलिसांनी जप्त केल्या मारणे टोळीच्या गाड्यागजा मारणेसह त्याच्या टोळीतील अनेक सदस्यांच्या गाड्या पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने 10 ते 15 गाड्या जप्त केल्या आहेत. त्यामुळे मारणे टोळीला पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मोठा दणका दिल्याचं पाहायला मिळत आहे.
Pune Crime : पुण्यात कोयता गँगचा पुन्हा हौदोसपुण्यात कोयता गँगने पुन्हा एकदा डोकं वर काढल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्यातील अप्पर इंदिरानगरमध्ये भर वस्तीतील गाड्या फोडत मोठमोठ्याने शिवीगाळ या गँगने केल्याचं समोर आलं आहे. परिसरात दहशत पसरवण्यासाठी टोळक्याने हा धुडगूस घातला आहे. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर आठ जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र, या अशा टोळक्यांना पोलिसांचा कसलाही धाक उरला नसल्याचं या घटनांमधून स्पष्ट होत आहे.
Jayakumar Gore : दुसऱ्यासाठी खणलेला खड्डा रामराजेंच्याच अंगलट - जयकुमार गोरेरामराजे नाईक-निंबाळकरांनी आयुष्यभर अनेक राजकीय नेत्यांना संपविण्याचा प्रयत्न केला. मात्र, जेव्हा दुसऱ्याला संपविण्यासाठी आपण खड्डा खोदतो, तेव्हा आपोआप तोच खड्डा आपल्यासाठीही तयार होतो. हीच परिस्थिती निंबाळकर यांच्याबाबत निर्माण झाल्याचं वक्तव्य सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केलं आहे.
Operation Sindoor : भारत 'ऑपरेशन सिंदूर'चं सत्य जगाला सांगणारभारत सरकार ऑपरेशन सिंदूरचं सत्य जगाला सांगणार आहे. यासाठी केंद्र सरकारकडून सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या अंतर्गत भारतीय लष्कराने केलेली कामगिरी जगापर्यंत पोहोचणार आहे.