इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका भारतासाठी खूपच महत्त्वाची आहे. यापूर्वी इंडिया ए संघ इंग्लंड दौऱ्यात दोन फर्स्ट क्लास सामने आणि टीम इंडियासोबत एक सराव सामना खेळणार आहे. या दौऱ्याला 30 मे पासून सुरुवात होणार आहे. यासाठी बीसीसीआयने 20 खेळाडूंची निवड केली आहे. शुबमन गिल आणि साई सुदर्शन दुसऱ्या सामन्यापासून संघासोबत असणार आहेत. पण यात श्रेयस अय्यरचं कुठेच नाव नाही. त्यामुळे क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण देशांतर्गत क्रिकेटमध्ये श्रेयस अय्यरने चांगली कामगिरी केली होती. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर वनडे संघात त्याची निवड झाली होती. पण कसोटी संघात असेल की नाही याबाबत साशंकता आहे. अजूनही इंग्लंड दौऱ्यासाठी संघाची घोषणा व्हायची आहे. पण श्रेयस अय्यरची संघात निवड होणं कठीण आहे. इंडिया ए संघातून डावलण्याचं कारण वाचून चाहत्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली आहे. चला जाणून घ्या श्रेयस अय्यरला इंडिया ए संघातून का डावललं ते
आयएनएस रिपोर्टनुसार, निवडकर्त्यांकडे खूप सारे पर्याय होते. संघाची निवड करणं एक कठीण काम होतं. बीसीसीआयने सल्ला दिला की, जे खेळाडू आयपीएल 2025 स्पर्धेच्या प्लेऑफमधून बाहेर झालेत किंवा त्यांची खेळण्याची शक्यता नाही, अशा खेळाडूंना निवडा. सूत्रांनी सांगितलं की, ‘खूप गोंधळ झाला होता आणि म्हणूनच बीसीसीआयने निवडकर्त्यांना अशा खेळाडूंसह संघ निवडण्याचा सल्ला दिला ज्यांचे संघ आयपीएल 2025 च्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर आहेत किंवा बाहेर पडण्याची शक्यता आहे. इंडिया ए साठी निवडलेले खेळाडू 25 मे रोजी इंग्लंडला रवाना होऊ शकतात.’ हे कारण वाचून क्रीडाप्रेमींच्या तळपायाची आग मस्तकात गेली आहे.
दरम्यान, गुजरात टायटन्स संघही प्लेऑफच्या शर्यतीत आहे. तसेच अंतिम फेरीसाठी दावेदारी आहे. मा्त्र शुबमन गिल आणि साई सुदर्शन या दोघांची नाव इंडिया ए संघात आहेत. दोघंही इंग्लंड लायन्सविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यापासून संघात सहभागी होतील. जर या दोघांची निवड झाली तर श्रेयस अय्यरची का नाही असा प्रश्न क्रीडाप्रेमी विचारत आहेत.
अभिमन्यू ईश्वरन (कर्णधार), ध्रुव जुरेल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, करुण नायर, नितीश कुमार रेड्डी, शार्दुल ठाकूर, ईशान किशन, मानव सुथार, तनुष कोटियन, मुकेश कुमार, आकाश दीप, हर्षित राणा, अंशुल कंबोज, खलील खान, खलील खान, खलील खान, तुरुंग खान, खलील खान, तुरुंग खान. हर्ष दुबे, शुभमन गिल आणि साई सुदर्शन (दोघेही दुसऱ्या सामन्यापासून उपलब्ध होतील)