दरवर्षी 18 मे रोजी आंतरराष्ट्रीय वस्तुसंग्रहालय दिन साजरा केला जातो.
नागरिकांमध्ये सजगता यावी या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो.
आंतरराष्ट्रीय वस्तुसंग्रहालय दिनाचे महत्व काय आहे हे जाणून घेऊया.
वस्तूसंग्रहालयांमुळे ऐतिहासिक ठेवा जपण्यास मदत होते. त्यांची निगा राखली जाते.
वस्तूंचा अभ्यास करून ती कोणत्या काळातील, शैलीची आहे, हे ठरवले जाते. त्यामुळे नागरिकांना अचूक माहिती मिळते.
ऐतिहासिक संदर्भासाठी वस्तूसंग्रहालयांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.
नव्या पिढीला संघर्षाची, विजयाची आणि अधिक यशस्वी होण्यासाठीची प्रेरणा वस्तूसंग्रहालयांतून मिळू शकते