वानखेडे स्टेडियमवर रोहित शर्माच्या नावाच्या स्टँडचं उद्घाटन करण्यात आलं आहे.
त्याच्यासह दिवंगत अजित वाडेकर आणि जेष्ठ नेते शरद पवार यांच्याही नावाच्या स्टँडचं उद्घाटन झालं.
वानखेडे स्टेडियममधील स्टँडला नाव मिळालेला रोहित पहिलाच व्यक्ती नाही.
यापूर्वीही वेगवेगळ्या दिग्गजांची नावं या स्टेडियममधील स्टँडला देण्यात आली आहे.
वानखेडे स्टेडियमवर सचिन तेंडुलकर,दिलीप वेंगसरकर, सुनील गावसकर आणि विजय मर्चंट या माजी खेळाडूंच्या नावाचेही स्टँड आहेत.
याशिवाय मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष विठ्ठल दिवेचा यांच्या नावेनेही स्टँड आहेत, तर पॉली उम्रीगर आणि विनू मंकड या खेळाडूंच्या नावाने गेट आहेत.
तसेच २०११ वनडे वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेविरुद्ध एमएस धोनीने ज्या ठिकाणी विजयी षटकात ठोकत भारताला विश्वविजेता केले होते, त्या ठिकाणी त्या षटकाराचे मेमोरियलही आहे.
गरवारे आणि टाटा पॅव्हेलियन या नावाचे एन्ड आहेत.