संजू राठोड (Sanju Rathod) सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याची जवळपास सर्वच गाणी सुपरहिट झाली आहेत. त्याच्या 'गुलाबी साडी' या गाण्याने तर सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. तर आता त्याचे 'शेकी' (Shaky) गाणे तुफान गाजत आहे. सर्वसामान्यांपासून ते कलाकारांपर्यंत सर्वजण या गाण्यावर भन्नाट रील्स बनवत आहे. संजू राठोड याच्या 'शेकी' गाण्यामध्ये 'बिग बॉस' फेम अभिनेत्री ईशा मालवीय झळकली आहे.
'' गाण्यातील आणि ईशा मालवीयचा अंदाज चाहत्यांना खूप आवडला आहे. आता या गाण्यावर थायलंडमधील एका लोकप्रिय अभिनेत्याने जबरदस्त डान्स केला आहे. ज्याची रील त्याने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केली आहे. हा अभिनेता 'पॅट्रिक' (Patrick) या नावाने ओळखला जातो. ज्याचे नाव निपत चारोएनफोल (Nipat Charoenphol) असे आहे. त्याने संजूच्या या गाण्यावर मस्त संजूच्या ठेका धरला आहे.
अभिनेत्याने 'शेकी' गाण्यातील "एक नंबर, तुझी कंबर…" या कडव्यावर भन्नाट डान्स केला आहे. गाण्याची हुकस्टेप्स करताना तो दिसत आहे. त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून चाहते घायाळ झाले आहे. त्याच्या या व्हिडीओवर संजू राठोड याने देखील कमेंट केली आहे. संजूने कमेंट करत लिहिलं की, "Bro फायर" तसेच या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. नेटकरी कमेंट्समध्ये 'लय भारी डान्स', 'जय महाराष्ट्र' आणि 'बापरे गाण्याची किती क्रेझ' अशा प्रतिक्रिया देत आहेत.
संजू राठोडचे 'शेकी' गाणे 22 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. काही दिवसांतच या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. याआधी संजू राठोडची 'गुलाबी साडी', 'काली बिंदी' ही गाणी खूपच गाजली होती. संजू राठोडचे चाहते आता त्याच्या नवीन प्रोजेक्टची आतुरतेने वाट पाहत आहेत.