Maharashtra News Live Updates : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं श्री छत्रपती कारखान्यासाठी मतदान
Saam TV May 18, 2025 04:45 PM
Maharashtra News Live Updates : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं श्री छत्रपती कारखान्यासाठी मतदान

इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अ वर्ग आणि ब वर्ग या दोन्हीही मधून या कारखान्यासाठी मतदान केलं आहे.

सोलापूरमध्ये भीषण आग, ३ जणांचा मृत्यू

सोलापुरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरातील भीषण आग विझावण्याचं काम युद्ध पातळीवर सुरु

आग लागल्या नंतर तात्काळ मुबलक प्रमाणात पोलीस यंत्रणा आणि अग्निशमन दलाच्या गाड्या झाल्या नसल्याचा मृतांच्या नातेवाईकांचा आरोप

स्थानिक लोकप्रतिनिधी ही घटनास्थळी उपलब्ध नसल्याचा नातेवाईक करतायत आरोप

या आगीत 3 जणांचा मृत्यू झाला असून अद्याप 4 ते 6 लोक टेक्सटाईल कंपनीत पडले आहेत अडकून

याबाबत मृतांच्या नातेवाईकांशी घटनास्थळावरून संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांनी

Ajit Pawar: आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार रायगड दौऱ्यावर

या दौऱ्यादरम्यान ते 14 वर्ष रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाची पहाणी करणार

० बास रस्त्याचे काम रखडल्याने कायम वाहतुक कोंडीमुळे चर्चेत असणाऱ्या माणगाव येथे आढावा बैठक

० बायपासचे काम रखडल्याने होणाऱ्या वाहतुक कोंडीवर मार्ग काढण्याबाबत स्थानिक नागरीक आणि अधिकाऱ्यांशी चर्चा

० संध्याकाळी महाडच्या चांदे क्रिडांगण येथे शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या स्नेहल जगताप यांचा पक्ष प्रवेश

० शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये रायगडच्या पालक मंत्री पदावरून वाद सुरु असताना मंत्री भरत गोगावले यांच्या बालेकिल्ल्यात अजितदादा काय बोलणार याकडे लक्ष

भरत गोगावलेंच्या होम ग्राऊंडवर अजित पवारांची तोफ धडाडणार

उपमुख्यमंत्री अजित पवार आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या स्नेहल जगताप यानी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. त्यानिमित्त आज महाड येथील चांदे क्रीडांगणावर कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आल आहे. या मेळाव्याला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे उपस्थित राहणार आहेत. रायगडच्या पालकमंत्री पदावरून सध्या आदिती तटकरे आणि शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. भरत गोगावले यांच्या मतदारसंघात होणाऱ्या या मेळाव्यात अजित पवार काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

बोगस बियाणे आढळल्यास संबंधितांवर कारवाई, खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत निर्देश

खरीप हंगामात शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा उत्तम दर्जाच्या आणि विहित दरात उपलब्ध व्हायला पाहिजे,यवतमाळ जिल्ह्यात कुठेही बोगस बियाणे खतांची विक्री ज्यादा दर लिंकिंग किंवा साठेबाजी सारखे प्रकार आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत पालकमंत्री संजय राठोड यांनी दिला.यावेळी राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्यासह जिल्ह्यातील आमदार उपस्थितीत होते.

Washim: विदेशी दारूची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई, दारूसाठ्यासह 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

वाशिमच्या मंगरूळपीर येथील लुल्ला वाईन शॉप मधील विदेश दारूची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या एका चारचाकी वाहनांवर कारवाई करत दोन जन ताब्यात घेण्यात आले आहेत.

या कारवाईमुळे अवैध धंदे करण्याऱ्या व्यवसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

हि कारवाई वाशिमचे उपविभागीय पोलीस अधिकारी नवदीप अग्रवाल यांनी केली केलीये.

दोन लाख रुपयांची देशी विदेशी दारू सह एक चार चाकी वाहन असा एकूण दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, यात सहभागी असलेले 25 जणांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी पोलीस अधिकारी नवदीप अग्रवाल यांनी माहिती दिली आहे.

Tuljapur: तुळजाभवानी चरणी हैदराबाद येथील भाविकाकडुन ५ तोळ्यांचा सुवर्णहार अर्पण

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी चरणी हैदराबाद येथील भाविक के निर्मला रेड्डी यांनी ५ तोळ्यांचा सुवर्णहार अर्पन केला आहे.तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येत असतात यामध्ये अनेक भाविक देवीच्या चरणी दान अर्पण करत करत असतात.तेलंगणा येथील रेड्डी यांनी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेवुन सुवर्णहार अर्पण केला यावेळी मंदीर संस्थानच्या वतीने देवीची प्रतिमा व महावस्त्रे देखील त्यांचा सत्कार करण्यात आला.

Solapur: सोलापुर शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी भागात कारखान्याला भीषण आग

सेंट्रल इंडस्ट्री या कारखान्याला मध्यरात्री तीन च्या सुमारास लागली भीषण आग

अग्निशमन दलाने आतापर्यंत आगीतून आतापर्यंत तिघांना गंभीर अवस्थेत बाहेर काढलं आहे,यातील 3 लोक दगवाल्याची प्राथमिक माहिती आहे

तर अद्याप ही 5-6 जण कारखान्यात अडकल्याची माहिती

घटनास्थळी अग्निशमन दलाची मोठी टीम पाहोचली आहे तर पोलिसांचा ही मोठा बंदोबस्त तैनात आहे

Ratnagiri Unseasonal Rain: रत्नागिरीमध्ये अवकाळी पावसाची हजेरी

रत्नागिरीत अवकाळी पावसानं हजेरी लावलीय मध्यरात्री जोरदार पाऊस रत्नागिरी आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये कोसळला 18 मे पर्यंत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये यलो अलर्टचा इशारा हवामान खात्याने दिला या हवामान खात्याचा हा अंदाज तंतोतंत खराब करताना आपल्याला पाहायला मिळतो या पावसामुळे पाणीटंचाईची समस्या काही प्रमाणात का होईना कमी झालीय तर गर्मीने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे त्यांचा गारवा मिळाला आहे

Navi Mumbai Cidco: सिडको-बिल्डर लॉबीचं साटंलोटं; नवी मुंबईकरांची फसवणूक सुरूच

सिडको प्रशासनाकडून चुकीचे निर्णय घेतले जात आहे सिडको-बिल्डर लॉबीचं साटंलोटं; नवी मुंबईकरांची फसवणूक केली जात आहे मात्र प्रकल्पग्रस्तांना सिडकोकडून भूखंड दिले जात नाही मात्र बिल्डरांसाठी भूखंड देण्याचा काम केल्या जात असे असा गंभीर आरोप सिडकोचे माजी संचालक नामदेव भगत यांनी केला आहे

Panvel: पनवेल न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, मीनाक्षी जयस्वाल हत्या प्रकरणातील तिन्ही आरोपींना दुहेरी जन्मठेप

१८ डिसेंबर २०१४ रोजी माजी महिला व बाल हक्क आयोग अध्यक्षा ॲड. मीनाक्षी जयस्वाल यांची त्यांच्या विश्वासू ड्रायव्हरने साथीदारासह निर्घृण हत्या केली होती.

दरोड्याच्या उद्देशाने घरात घुसून तेरावेळा चाकूने वार करत त्यांची हत्या करून दागिने चोरले होते.

परिस्थितीजन्य पुरावे आणि २० साक्षीदारांच्या साक्षांवरून पनवेल न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवत दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

मृत मीनाक्षी जयस्वाल यांचे पती डॉक्टर संतोष जयस्वाल हे मालेगाव कोर्टात न्यायाधीश म्हणून कार्यरत होते.

हा खटला तब्बल १० वर्षं चालला असून, अखेर मीनाक्षी जयस्वाल यांच्या आरोपींना शिक्षा मिळाली आहे. सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांनी काम पाहिले .

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.