ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ईडीच्या अटकेनंतर तुरुंगांत घालवलेल्या 100 दिवसांच्या अनुभवांवरून 'नरकातला स्वर्ग' हे पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया देताना मिश्कील टोला लगावला आहे. पत्रकारांनी संजय राऊतांच्या नरकातील स्वर्ग पुस्तका संदर्भात प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले, "मी काय त्यावर बोलणार नाही, मला काही बोलायचंही नाही. मी हे पुस्तक वाचलेल नाही. शिवाय मला नरकाचं काय माहिती नाही, स्वर्गाचं असेन तर सांगेन, असं म्हणत त्यांनी राऊतांना टोला देखील लगावला.
Porsche Car Accident : पोर्शे कार अपघात प्रकरणी पोलिसांचे न्यायालयात पत्रपुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणाबाबत नवी अपडेट समोर आली आहे. या अपघात प्रकरणाचा खटला जलदगतीने चालवण्यासाठी पुणे पोलिसांनी न्यायालयात पत्र दाखल केलं आहे. या प्रकरणात कारचालकासह त्याच्या दोन मित्रांच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी आरोपी विरोधातील खटला जलदगतीने चालवावा अशी विनंती या पत्रातून करण्यात आली आहे.
शिवराज दिवटे मारहाण प्रकरण; विविध संघटनांकडून बीड बंदची हाकपरळी येथील शिवराज दिवटे या तरुणाला टोळक्याने अमानुष मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. अशातच आता या मारहाणीच्या घटनेचा निषेध करण्यासाठी उद्या परळीसह बीड जिल्हा बंदची हाक विविध संघटनांकडून देण्यात आली आहे. यामध्ये अनेक मराठा संघटनांचा देखील समावेश आहे.
अमेरिकेत दहशतवादी हल्लाअमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील गर्भधारणा केंद्रावर कार बॉम्बने दहशतवादी हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये एकाचा मृत्यू तर 5 जण जखमी असल्याची माहिती समोर आली आहे.
मनोज जरांगे बीड दौऱ्यावर, मारहाण झालेल्या तरुणाची घेणार भेटमनोज जरांगे बीड दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात परळीमध्ये मारहाण झालेल्या शिवराज दिवटे या तरुणाची ते भेट घेणार असल्याची माहिती आहे. दिवटे याला मारहाण केल्याप्रकरणी तब्बल 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिवटे याला बेल्ट, काठ्या आणि राॅडने बेदम मारहाण करण्यात आली होती.
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या गाडीला अपघातशेतकरी नेते रविकांत तुपकर हे आंदोलनासाठी आपल्या वाहनाने जात असताना टोलनाक्यावर त्याच्या वाहनाला ट्रकने मागून धडक दिली. अंबाजोगाई तालुक्यातील देवळा येथील कर्जमुक्ती आंदोलनाच्या सभेला संबोधित करून तुपकर जात असताना हा अपघात झाला. या अपघातमध्ये कोणी जखमी झाले नाही. पोलिसांनी ट्रकचालकाला ताब्यात घेतले चौकशी सुरू केली आहे.
युपीएससीची पूर्व परीक्षा 24 मे रोजी होणारयुपीएससीच्या स्पर्धा परीक्षेंचे वेळापत्रक लोकसेवा आयोगाने जाहीर केले आहे. त्यानुसार पूर्व परीक्षा 24 मेला होणार आहे. तर, मुख्य परीक्षा 21 ऑगस्टला होणार आहे.
आम्ही पाकच्या न्युक्लिअर धमक्यांना घाबरत नाही - अमित शाहउरी, पुलवामा नंतर कारवाई करत इशारा दिला होता आता ऑपरेशन सिंदूरमधून पाकिस्तानचे एअरबेस नष्ट केले. पाकिस्तानमधील दहशतवादी हल्ले नष्ट केले. आम्ही पाकच्या न्युक्लिअर धमक्यांना घाबरत नाही. भारताच्या हल्ल्याने पाकिस्तान घाबरला, असे गृहमंत्री अमित शाह म्हणाले.
छत्रपती सहकारी कारखान्यासाठी मतदानछत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
सोलापूरच्या अक्कलकोट रोड एमआयडीसीत भीषण आग, तीन कामगारांचा मृत्यूसोलापूर शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी भागातील कारखान्याला लागलेल्या आगीने तीन कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. शनिवारी रात्री कारखान्याला आग लागली. आणखी पाच ते सहा जण कारखान्यात अडकून पडल्याची भीती आहे.