DC vs GT : जीटीचा दिल्लीवर 10 विकेट्सने धमाकेदार विजय, गुजरातसह आरसीबी आणि पंजाबही प्लेऑफमध्ये
GH News May 19, 2025 02:05 AM

गुजरात टायटन्सने आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 60 व्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्सवर 10 विकेट्सने धमाकेदार विजय मिळवला आहे. दिल्लीने गुजरातला विजयासाठी 200 धावांचं आव्हान दिलं होतं. गुजरातने हे आव्हान 19 ओव्हरमध्ये एकही विकेट न गमावता गमावून पूर्ण केलं. गुजरातने 205 धावा केल्या. कर्णधार शुबमन गिल आणि साई सुदर्शन ही जोडी गुजरातच्या विजयाची शिल्पकार ठरली. साईने शतकी खेळी केली. तर शुबमनने नाबाद 93 धावा केल्या.गुजरातने यासह प्लेऑफमध्ये धडक दिली. तसेच गुजरातच्या या विजयासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्सनेही प्लेऑफमध्ये प्रवेश केलाय.

शुबमन-साईची ऐतिहासिक भागीदारी

शुबमन आणि साईने या नाबाद द्विशतकी भागीदारीसह इतिहास घडवला. साई आणि शुबमन आयपीएल इतिहासात नाबाद सलामी द्विशतकी भागीदारी करणारी पहिलीच जोडी ठरली. या दोघांनी या भागीदारी दरम्यान चौफेर फटकेबाजी करत गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. साईने या खेळीत 61 चेंडूत 4 षटकार आणि 12 चौकारांसह 108 धावांची नाबाद खेळी केली. तर शुबमनने 53 बॉलमध्ये 7 सिक्स आणि 3 फोरसह नॉट आऊट 93 रन्स केल्या.

केएल राहुलची शतकी खेळी व्यर्थ

त्याआधी गुजरातने टॉस जिंकून दिल्लीला बॅटिंगसाठी भाग पाडलं. दिल्लीने 20 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 199 धावा केल्या. दिल्लीसाठी केएल राहुल याने नाबाद शतकी खेळी केली. केएलने 65 बॉलमध्ये 14 फोर आणि 4 सिक्ससह नॉट आऊट 112 रन्स केल्या. अभिषेक पोरेल याने 30 रन्स केल्या. कर्णधार अक्षर पटेल याने 25 धावांचं योगदान दिलं. तर ट्रिस्टन स्टब्सने 21 धावांचं योगदान दिलं. तसेच गुजरातकडून अर्शद खान, प्रसिध कृष्णा आणि साई किशोर या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

गुजरातची प्लेऑफमध्ये धडक

गुजरातमुळे दोघांचा फायदा

दरम्यान गुजरातच्या विजयामुळे इतर 2 संघांचाही फायदा झाला. पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे दोन्ही संघही प्लेऑफमध्ये पोहचले. गुजरातचा हा नववा विजय ठरला. त्यामुळे गुजरात 18 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी विराजमान झाली आहे. तर आरसीबी आणि पंजाब किंग्स या दोन्ही संघांच्या खात्यात प्रत्येकी 17-17 गुण आहेत. आरसीबी पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या आणि पंजाब किंग्स तिसऱ्या स्थानी आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.